हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात एक व्हायरल व्हिडीओ सुद्धा तुम्हाला रातोरात स्टार बनवू शकतो. उत्तर प्रदेशमधल्या बांदा इथे राहणारा विपिन कुमार साहू याच्याबाबतीतही अगदी असंच घडलंय. मनालीच्या एका ट्रिपने विपिनचं नशीबच बदलून गेलंय आण तो एका रात्रीत सेलिब्रिटी बनलाय. हल्ली तर तो आता टीव्ही शोजपासून ते अगदी वेगवेगळ्या म्यूजिक अल्बममध्ये झळकताना दिसतोय. सोबत तो आता उद्योजक सुद्धा बनलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही ज्या मुलाबद्दल तुम्हाला सांगतोय तो २०१९ मध्ये चर्चेत आलेला पॅराग्लायडिंग करताना जोरात ‘लॅंड करा दे’ असं ओरडणारा तो मुलगा आहे. विपिन कुमार साहूला ऍगोराफोबिया (उंचीची भीती) असताना सुद्धा त्याच्या मित्रांनी त्याला पॅराग्लायडिंग करण्यासाठी भाग पाडलं होतं. सुरूवातीला विपिनने याला नकार दिला होता. पण मग ट्रोलिंगच्या भीतीने विपिनने पॅराग्लायडिंगसाठी होकार दिला आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहून सारेच जण हैराण झाले.

या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना विपिनने सांगितलं, “मी त्यावेळी माझे डोळे बंद करत जोरजोरात ओरडू लागलो की, ‘जग्गा भाई लॅंड करा दो…मुझे लॅंड करा दो…’ त्यावेळी मला स्वतःला कळत नव्हतं की मी काय ओरडतोय…त्यानंतर रूमवर गेल्यानंतर मी माझा व्हिडीओ पाहिला तर तो व्हिडीओ खूप भयंकर वाटला. तो व्हिडीओ कुठेच न शेअर करण्याचा निर्णय घेतला होता.”

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तुम्ही कधी ‘कुकर कॉफी’ घेतली आहे का?; रस्त्यावरील विक्रेत्याचा VIDEO VIRAL एकदा पाहाच…

कसा व्हायरल झाला ‘लॅंड करा दे’चा व्हिडीओ?
मनाली ट्रिपनंतर विपिनच्या छोट्या भावाने हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केला होता. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर या व्हिडीओवर वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. त्यानंतर विपिन कितीतरी दिवस घराबाहेर पडलाच नाही. त्यावेळी तो जिथे जिथे जात होता, तिथे प्रत्येक ठिकाणी त्याला ट्रोल केलं जात होतं.

अखेर चार पाच दिवसानंतर विपिनने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्याचं नशीबच बदलून गेलं. विपिन कुमार साहूने सांगितलं की, “माझा टाईल्सचा व्यवसाय आहे… माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माझ्या ग्राहकांची संख्या देखील वाढू लागली…काही लोक तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पॅराग्लायडिंग करणाऱ्या मुलाकडू टाईल्स विकत घेतल्या आहेत, हे दाखवण्यासाठी माझ्याकडून टाईल्स घेऊन जाऊ लागले.”

आणखी वाचा : पुन्हा चर्चेत आली ‘पाकिस्तानी गर्ल’; दिलखेचक स्माईलने घायाळ करणारा नवा VIDEO VIRAL

टाईल्सचा व्यवसाय वाढू लागला…
सोशल मीडियावर विपिनचा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी प्रत्येक महिन्याला तो जवळपास १० ते १२ लाख रूपयांचा व्यवसाय करत होता. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा हाच व्यवसाय १५ ते २० लाखांपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याने आणखी एक-दोन व्यवसाय नव्याने सुरू केले. हळुहळु त्याने एक जीमचा व्यवसाय देखील सुरू केला.

टीव्ही शोज, वेब सीरिज आणि म्युझिक अल्बम…
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विपिनचं नशीब अगदी पालटून गेलं. त्याला कलर्स टीव्हीच्या एका शोमध्ये देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. याशिवाय हॉटस्टारवर एका वेब सीरिजसाठी देखील त्याला ऑफर मिळाली. सोबतच एका म्युझिक कंपनीने विपिनला अप्रोच केलंय. हा म्युझिक अल्बम लवकरच रिलीज करण्यात येणार आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आधी पोटोबा आणि मग…, भूकेने व्याकूळ ड्रायव्हरने कार्डमधील माहिती लीक होण्याची जोखीम पत्कारली

व्हिडीओमुळे १७ लाखांची कमाई
विपिन कुमार साहू स्वतःचे YouTube चॅनल देखील आहे. व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी त्याचे ८० ते ९० सबस्क्राइबर होते, पण त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सबस्क्राइबर १४ हजारांवर पोहोचले, नंतर ३५ हजार आणि आता १.३१ लाख इतके झाले आहेत. सुरुवातीला त्याला व्हिडीओच्या कॉपीराइटबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी त्याचा व्हिडीओ अपलोड केला त्या सर्वांनी पैसे कमवले.

आणखी वाचा : केसांनी स्वतःला टांगत महिलेने केला खतरनाक स्टंट; VIRAL VIDEO पाहून तुम्ही व्हाल हैराण

विपिन कुमार साहू याच्या म्हणण्यानुसार, ‘लॅंड करा दे’ व्हिडीओची कमाई सुमारे १५ ते १७ लाख रुपये होती, परंतु त्याला फक्त ६ ते ७ लाख रुपये मिळाले. त्यानंतर एका कंपनीने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्या व्हिडीओचे कॉपीराइट घेतले. आज त्याला या व्हिडीओमधून भरघोस कमाई होतेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paragliding man vipin kumar sahu land kara de viral video rich and famous tv show start up google trending video today prp
First published on: 01-12-2021 at 19:16 IST