Parama Ekadashi Vrat 2026: हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी अनेक विष्णू भक्त उपवास करतात, त्यांची पूजा-आराधना करतात. एकादशी तिथी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा दोन्ही पक्षात साजरी केली जाते. सध्या वैशाख महिना सुरू असून या महिन्यामध्ये अपरा एकादशीचे व्रत केले जाईल. या एकादशीला अचला एकादशी देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या एकादशीला श्री विष्णूंची पूजा-आराधना केल्याने आयुष्यातील सर्व सुख प्राप्त होते. दरम्यान, सध्या गूगल ट्रेंडवरदेखील परमा एकादशी व्रक कथा हा कीवर्ड ट्रेंड होत आहे.

परमा एकादशी २०२६ शुभ मुहूर्त आणि तिथी

पंचांगानुसार, अधिक ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात ११ जून रोजी मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल, तसेच ही तिथी ११ जून रोजी रात्री १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल. परंतु, उदय तिथीनुसार हे व्रत ११ जून रोजी केले जाईल. व्रताचे पारण १२ जून रोजी द्वादशी तिथी समाप्त होण्यापूर्वी केले जाईल.

परमा एकादशीचे महत्व

धार्मिक मान्यतेनुसार, कथेनुसार, सुमेध नावाचा एक दानशूर ब्राह्मण आणि त्याची एकनिष्ठ पत्नी पवित्रा कांपिल्य शहरात राहत होते. ते दोघेही अत्यंत गरीब होते, पण गरिबी असूनही ते पाहुणचार आणि धर्माच्या मार्गापासून कधीही विचलित झाले नाहीत. एकदा, गरिबीला कंटाळून सुमेधाने पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार केला. पवित्राने त्याचे सांत्वन करत म्हटले की, घरी राहून आणि धर्माच्या मार्गाचे पालन करूनच नशीब आणि मागील जन्मांचे परिणाम बदलता येतात.

काही काळानंतर, कौंडिन्य ऋषी त्यांच्या घरी आले. त्यांची अवस्था अत्यंत वाईट असूनही, त्या दांपत्याने ऋषींची उत्तम सेवा केली. जेव्हा पवित्राने ऋषींना आपले दारिद्र्य दूर करण्याचा उपाय विचारला, तेव्हा ऋषी कौंडिन्यांनी तिला अधिक मास महिन्याच्या कृष्ण पक्षात परम एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. ऋषींच्या परवानगीने, सुमेधा आणि पवित्राने पूर्ण भक्ती आणि शिस्तीने व्रत पाळले, पूजा केली, दानधर्म केला आणि रात्रभर जागरण केले.

‘या’ मंत्राचा जप करा

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा सतत जप करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा.

परमा एकादशीला या गोष्टी करू नका

  • एकादशीला भात खाण्यास सक्त मनाई आहे.
  • एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी पाने एक दिवस आधी (द्वादशीपूर्वी) तोडावीत.
  • लसूण, कांदा, मांस किंवा मद्यपान करू नका.
  • या दिवशी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे ​​कापणे शुभ मानले जात नाही.
  • कोणाशीही अपमानास्पद भाषेत बोलू नका आणि घरात शांतता राखा.
फोटो सौजन्य: Google Trend

दरम्यान, सध्या गूगल ट्रेंडवरदेखील परमा एकादशी व्रत कथा हा कीवर्ड ट्रेंड होत आहे. वर दिलेल्या गूगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, मागील पाच तासांमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक युजर्सनी ‘परमा एकादशी व्रत कथा’ हा कीवर्ड सर्च केला आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)