Digital Kanyadan Viral Video : सोशल मीडियावर रोज नवीन आणि अनोखे व्हिडिओ पाहायला मिळतात. लग्नाचेही अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाच क्षण मानला जातो. या समारंभात आपल्या जवळले सर्व लोक विशेषत: आई- वडील असेच पाहिजे अशी इच्छा असते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळत आहे, जिथे एकुलत्या एक मुलीच्या लग्नात आई वडिलांना उपस्थित राहता न आल्याने त्यांनी लग्नासाठी थेट ऑनलाईन हजेरी लावली आहे. ज्यामुळे हा लग्न सोहळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
इतकेच नाही तर या व्हिडिओमध्ये आई-वडील ‘डिजिटल कन्यादान’ करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता, हे आई-वडील आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. पासपोर्ट नसल्याने त्यांना अमेरिकेत मुलीच्या लग्नाला जाता आले नाही, तरी त्यांनी आपल्या मुलीच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण चुकवू दिला नाही. त्यांनी घरीच मोठ्या टीव्ही स्क्रीनवर लग्नाचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले आणि तिथूनच लग्नाच्या विधींमध्ये सहभाग घेतला.
जसे स्क्रीनवर वर-वधू मंडपात विधी करताना दिसले, तसे घरात बसलेल्या आई-वडिलांनी टीव्हीसमोर उभे राहून भटजींच्या मंत्रोच्चारासह अक्षता आणि फुले टाकण्यास सुरुवात केली. स्क्रीनवर दिसणाऱ्या वधू-वराच्या डोक्यावर आशीर्वाद देताना आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि थोडीशी भावुकता स्पष्ट दिसत होती.
https://twitter.com/Journo_laxman/status/2093972060464701848
हा व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेलच शिवाय तुम्ही भावूकही व्हाल. या डिजिटल लग्नाच्या व्हिडीओवर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “हे ५जी च्या काळातील ‘डिजिटल कन्यादान’ आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “अंतर कितीही असो, आई-वडिलांचा आशीर्वाद नेहमीच मुलांसोबत असतो.” काही लोकांनी तंत्रज्ञानाचे कौतुक करत म्हटले की, आजच्या तंत्रज्ञानाने सातासमुद्रापाराचे अंतरही मिटवून टाकले आहे.
