Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक वाट्टेल ते व्हिडीओ बनवत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकल्याचे डोकं जिन्याचे रेलिंगमध्ये अडकलेले आहे आणि तो काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर त्याचे आई वडील येतात आणि हे पाहून घाबरतात. पण पुढे जे काही घडते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल आणि तुम्हालाही वाटेल की लोकं प्रसिद्धीसाठी काहीपण करतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओमध्ये जिन्याच्या रेलिंगमध्ये एका चिमुकल्याचे डोके अडकलेले दिसत आहे. हा चिमुकला रेलिंगमधून डोके बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करताना दिसतो. तिकक्यात त्याचे आईवडिल येतात आणि त्याचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण त्यानंतर ते वडील हत्यार आणतात आणि आई फोन करायला मोबाईल खिशातून काढते. तितक्यात हा चिमुकला बाहेर स्वत:हून रेलिंगमधून सहजपणे बाहेर पडतो आणि आईवडिलांची खोडी केल्याचे सांगतो. हे पाहून आई वडील अवाक् होतात.
तुम्हाला वाटेल, हे खरंच घडलं का? तर नाही तर हा व्हिडीओ रिलसाठी बनवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल पण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. मनोरंजनाच्या दृष्टीने विचार केला तर हा व्हिडीओ अनेकांना आवडू शकतो पण सोशल मीडियावर लहान मुलांनी हा व्हिडीओ बघून असेच अनुकरण करू नये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents were scared by seeing a child head is seen stuck in the railing of the staircase video goes viral on instagram social media ndj
First published on: 14-02-2024 at 12:31 IST