सकाळी गरमागरम चहाबरोबर बिस्कीट किंवा पोळी खाल्ली, तर दिवसाची सुरुवात आणखीन छान होते. बिस्किटाचं नाव काढलं की, सगळ्यात पहिले समोर नाव येते ते म्हणजे प्रसिद्ध ‘पार्ले-जी बिस्कीट’चे. आजही भारतात सर्वांत जास्त विकले जाणारे बिस्कीट म्हणजे पार्ले-जी बिस्कीटच आहे; जे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. या बिस्किटांची चव तर निराळी आहेच; पण याची किंमतही अगदीच कमी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आज पार्ले-जी कंपनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
पार्ले-जी बिस्कीट हातात घेतले की, डोळ्यांसमोर दिसते ती पांढरा फ्रॉक घातलेली चिमुकली. आज पार्ले-जी कंपनीने एका इन्फ्ल्युएन्सरचा व्हिडीओ पाहून, या चिमुकलीच्या जागी इन्फ्ल्युएन्सरचा फोटो एडिट केला आहे. तर गंमत अशी आहे की, इन्फ्ल्युएन्सर तरुणाने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्याने लिहिले की, जर तुम्ही पार्ले-जी कंपनीच्या मालकाला भेटलात, तर तुम्ही त्याला पार्ले सर, मिस्टर पार्ले की पार्ले-जी म्हणाल…? तर हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया देत पार्ले-जीने एक पोस्ट शेअर केली.
हेही वाचा…सलमान खान लग्न कधी करणार? मॅरेज ब्युरोनं जाहिरातीवर लावला “भाईजान”चा फोटो
पोस्ट नक्की बघा :
तर, पार्ले-जी कंपनीने एक फोटो पोस्ट केला आहे. बिस्किटांच्या रॅपरवर चिमुकलीच्या जागी या @bunshah जेरवान जे. बनशाह या इन्फ्ल्युएन्सरचा फोटो एडिट केला आणि पार्लेच्या (Parle) जागी तरुणाचे नाव लिहून पुढे जी (G) जोडण्यात आले. तसेच, पार्ले-जीच्या मालकाला काय म्हणायचे हे तुम्ही शोधून काढत असतानाच, तुम्ही आम्हाला आवडत्या बिस्किटाबरोबर एक कप चहाचा आनंद घेण्यासाठी कॉल करू शकता… काय म्हणता @बनशाह जी?, अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @officialparleg यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. तसेच इन्फ्ल्युएन्सरने ही पोस्ट पाहताच त्याच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त केल्या आहेत आणि लहानपणापासून पार्ले-जी बिस्कीट त्याच्यासाठी किती खास ठरलंय, हे सांगितले आहे आणि सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
