Parvati Hanuman Ansh Song Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. त्यात पारंपरिक पोशाख, दमदार हावभाव आणि आकर्षक नृत्याची जोड असेल, तर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातं. असाच एक सुंदर डान्स परफॉर्मन्स सध्या चर्चेत आला आहे. ‘जब जिद्द पे आ गई पार्वती’ या कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या या डान्स व्हिडीओमध्ये ही चिमुकली पार्वतीच्या रूपातील भाव-भंगिमा सादर करताना दिसत आहे. हे गाणं सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान चालत असलेल्या हनुमान अंश या चित्रपटातलं आहे.

लाल रंगाच्या घागऱ्यात खुलला पारंपरिक अंदाज

परफॉर्मन्समध्ये या मुलीने लाल रंगाचा आकर्षक घागरा आणि पारंपरिक डिझाइनचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. पारंपरिक दागिने आणि मेकअपमुळे तिचा संपूर्ण लूक आणखी खुलून दिसत आहे. स्टेजवरील प्रकाशयोजना आणि पार्श्वभूमीमुळे या डान्सला एक वेगळाच नाट्यमय अंदाज मिळाला आहे.

हावभावांनी साकारली ‘पार्वती’

या व्हिडीओची खासियत केवळ पोशाखात नाही, तर नृत्यातून व्यक्त होणारे भाव हे देखील आहेत. हातांच्या मुद्रा, चेहऱ्यावरील हावभाव आणि नृत्याच्या तालावर केलेल्या हालचालींमधून पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘जब जिद्द पे आ गई पार्वती’ या कॅप्शनमुळेही व्हिडीओला वेगळा संदर्भ मिळतो. ‘बर्कत अरोरा’ यांच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गाण्यात नेमकं काय आहे?

गाण्याची सुरुवात “जब जिद पे आ गई पार्वती…” अशी होते. यात पार्वतीला समजावण्यासाठी सप्तऋषी येतात आणि भगवान शिवांशी विवाह करण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. शिवांच्या साध्या, वैरागी रूपाचं वर्णन करताना गाण्यात लोकभाषेचा मजेशीर वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे साधं पारंपरिक हिंदी भजन नसून बुंदेली बोली आणि लोकगीताच्या ढंगात तयार केलेलं भक्तीगीत आहे. त्यामुळेच त्याची भाषा आणि ताल सोशल मीडियावर वेगळे ठरत आहेत.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष

डान्स, पारंपरिक लूक आणि दमदार एक्स्प्रेशन्स यांचा मेळ साधणाऱ्या या परफॉर्मन्सने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. #dance, #trending, #barkatarora आणि #barkatarorachoreography यांसारख्या हॅशटॅग्ससह हा कंटेंट शेअर करण्यात आला आहे. नृत्याच्या माध्यमातून पौराणिक पात्राची भावभावना सादर करण्याचा हा प्रयत्न नेटकऱ्यांना आवडताना दिसत आहे.