scorecardresearch

Pasoori Viral Video: पसूरी गाण्याचं वीणा व्हर्जन ऐकलंत का? एकही शब्द न उच्चारता ‘या’ तरुणाने पार वेड लावलं

Ali Sethi Pasoori Viral Video on Veena: अली सेठी आणि शे गिल यांनी गायलेली कोक स्टुडिओचे गाणे पसूरी अजूनही इंस्टाग्रामवरील रील स्टार्समध्ये प्रसिद्ध आहे.

Pasoori on Veena version Coke Studio Viral Video Ali Sethi and Shae Gill songs
Pasoori on Veena version Coke Studio Viral Video Ali Sethi and Shae Gill songs (फोटो: इंस्टाग्राम)

Ali Sethi Pasoori Viral Video on Veena: अली सेठी आणि शे गिल यांनी गायलेली कोक स्टुडिओचे गाणे पसूरी अजूनही इंस्टाग्रामवरील रील स्टार्समध्ये प्रसिद्ध आहे. या गाण्यावर इतके रील्स बनले आहेत की एका वेळी तर तुम्ही स्क्रोल करताना प्रत्येक दुसऱ्या व्हिडिओत हेच गाणं ऐकू येत होतं. मूळ गाणं जितकं सुंदर आहे तितकेच श्रवणीय असे काही रिमेक सुद्धा आपण ऐकले असतील असाच एक पसूरीचा व्हायरल व्हिडीओ सध्या समोर येत आहे, सोशल मीडियावर हा पसूरीचा रिमेक इतका व्हायरल होतोय की तुम्ही हा पाहण्याची संधी गमावू नयेच. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे कारणही तितकंच खास आहे. या व्हिडीओमध्ये पसूरी गाण्याचं वीणा व्हर्जन एका अत्यंत टॅलेंटेड तरुणाने सादर केले आहे.

सुमतिंद्र कोर्टी या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की संगीतकार स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. साधारण त्याला वीणा घेऊन पाहिल्यावर अनेकांनी आता तो शास्त्रीय संगीत वाजवणार किंवा काहीतरी जुन्या पारंपरिक शैलीचं सादरीकरण करणार असा सर्वांचा समज होतो पण इतक्यात तो वीणेवर पसूरीचे सूर छेडतो व प्रेक्षकांना विश्वासच बसत नाही. त्याने गाणे सुरु करताच होणारा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट याची साक्ष देत आहे.

Navratri 2022 Garba Video: ए हालो… घागरा घालून स्विमिंग पूलमध्ये उतरल्या तरुणी, गाणं वाजताच..

पसूरीचे वीणा व्हर्जन झाले Viral

Nauvari Rap Video: Hustle गाजवणारी ‘ही’ विदर्भाची पोट्टी आहे कोण? नऊवारी व नथ घालून हिप हॉपला दिला तडका

हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, याला जवळपास 14 दशलक्ष म्हणजेच एक कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत आणि दिवसेंदिवस हे व्ह्यूज वाढत आहेत. १८ दशलक्ष युजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे तर अनेकांनी कमेंट करून या प्रतिभाशाली तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याला म्हणतात खरे टॅलेंट अशा हजारो कमेंट्स तुम्ही या व्हिडिओवर पाहू शकता आणि हा व्हिडीओ पाहताच तुम्हीही हेच म्हणाल हे निश्चित आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2022 at 16:45 IST
ताज्या बातम्या