वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठे तरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुले फिरतायत. त्यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात; तर काही जणी घाबरून शांत बसतात.
सध्या अशीच एक घटना चक्क विमानात घडलीय. त्यात एका प्रवाशाने चक्क हवाई सुंदरीचा अश्लील व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ…
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका विमानात एक अतिशय लज्जास्पद कृत्य घडलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका विमानात हवाई सुंदरी आपलं काम करताना दिसत आहे. तेवढ्यात विमानातील एक प्रवासी लपून तिच्या स्कर्टचा व्हिडीओ काढण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. बाहेरच्या सीटवर बसून या प्रवाशाने अगदी ???जमिनीच्या अंतरावर खाली मोबाईल लपवत (की- जमिनीलगत खाली मोबाईल लपवत)??? हवाई सुंदरीचा अश्लील व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रवाशाचं हे कृत्य बराच वेळ सुरू असताना अचानक विमानातील काही स्टाफच्या हे लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी लगेच त्या प्रवाशाचा फोन ताब्यात घेतला.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/izuchukwumedia/reel/DEypJ4nSPzC
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @izuchukwumedia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘एका विमानातील प्रवाशाने फ्लाईट सुरू असताना हवाई सुंदरीच्या स्कर्टचा व्हिडीओ रेकॉर्ड केला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “तो व्हिडीओ रेकॉर्ड करीत असल्याचं तुम्ही लवकर पाहिलं म्हणून धन्यवाद.” दुसऱ्याने “अरे, हिंमतच कशी होते?” अशी कमेंट केली. तिसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “मला अशा लोकांची मानसिकताच समजत नाही.”
© IE Online Media Services (P) Ltd