scorecardresearch

Premium

स्टेशनवरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू झाला अन्…, रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांची शरमेने झुकली मान

LED स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ चालू झाल्यामुळे प्रवाशी अस्वस्थ झाले.

Patna Railway Station Porn Video
रेल्वे स्टेशनवरील एका धक्कादायक घटनेमुळे प्रवाशांना शरमेने मान झुकवावी लागली आहे. (Photo : Twitter)

बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे अनेक प्रवाशांना शरमेने मान झुकवावी लागली आहे. तर रेल्वेच्या भोंगळ कारभारावर अनेकांनी टीका केली आहे. कारण पाटणा रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ चालू झाला त्यामुळे प्रवाशांमध्ये अचानक गोंधळाच वातावरण निर्माण झालं. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ तब्बल ३ मिनिटे चालू होता. याप्रकरणी प्रवाशांनी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय रेल्वेने सबंधित कंपनीवर कठोर कारवाई केली आहे.

LED स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ चालू झाल्यामुळे लोक अस्वस्थ झाले. शिवाय स्टेशनवर उपस्थित असलेल्या महिलांनी तर शरमेने आपल्या माना खाली घातल्या. हा व्हिडीओ काही क्षणात बंद होईल वाटलं पण तो तब्बल तीन मिनिटे चालू होता. त्यामुळे अनेकांना एकमेकांच्या तोंडाकडे बघणं कठीण झालं होतं. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर हा पॉर्न व्हिडिओ बंद झाला. शिवाय ही तक्रार केली नसती तर हा व्हिडिओ किती वेळ चालू राहिला असता? असा सवालही प्रवाशी विचारत आहेत.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हेही पाहा- माणुसकीला काळीमा! कुत्र्याला बाईकला बांधल आणि २ किमीपर्यंत…, संतापजनक घटनेचा Video व्हायरल

जाहिरात एजन्सी काळ्या यादीत –

रिपोर्टनुसार, या लाजिरवाण्या घटनेनंतर संबंधित जाहिरात एजन्सीवर आरपीएफ पोस्टमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. शिवाय रेल्वेनेही या प्रकरणी कडक कारवाई केली आहे. डीआरएम प्रभात कुमार यांनी पाटणा जंक्शन येथे अश्लील व्हिडिओ चालवणाऱ्या जाहिरात एजन्सीवर मोठा दंड ठोठावला असून त्यांनी या एजन्सीबरोबरचा करार रद्द करत ती एजन्सी काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही दिले आहेत.

यापूर्वीही घडली होती घटना –

हेही पाहा- बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत; कंडक्टरची तिकीट काढण्यासाठी कसरत, Video पाहून पोट धरुन हसाल

पाटणा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व प्लॅटफॉर्मवर LED स्क्रीन लावण्यात आल्या आहेत आणि यापैकी एका स्क्रीनवर पॉर्न व्हिडिओ चालू झाला. धक्कादायक बाब म्हणजे पाटण्यात याआधीही एलईडी स्क्रीनवर असे घाणेरडे व्हिडीओ लागल्याच्या घटना घडल्या होत्या. पण त्यावेळी घटना घडून गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतची माहीती मिळाली होती. पण यावेळी लगेच तक्रार केल्यामुळे कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×