Premium

ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…

ट्रेनमध्ये डान्स करण्याऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ काही दिवसांपासून खूपच व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या हा व्हिडीओ पाहून उत्तर रेल्वेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
(सौजन्य:ट्विटर/@RailwayNorthern) ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला….

मेट्रोत तुम्ही गाणं गाणारे, डान्स, फॅशन शो, अश्लील चाळे, भांडण करणारे अनेक प्रवासी पाहिले असतील. परंतु, आता मेट्रोत नाही, तर ट्रेनमध्ये डान्स करण्याऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ काही दिवसांपासून खूपच व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या हा व्हिडीओ पाहून उत्तर रेल्वेने (Northern Railway) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि ट्रेनमध्ये व्हिडीओ बनवणाऱ्या सर्व प्रवाशांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर रेल्वेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्रेनमधील आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांची एकच गर्दी दिसते आहे आणि गर्दीत एक व्यक्ती डान्स करताना दिसते आहे. एक हिंदी गाणं लावण्यात आलं आहे आणि व्यक्ती त्याच्यावर ठेका धरून नाचते आहे. तसेच या व्यक्तीला एक अज्ञात व्यक्ती टाळ्यांच्या गजरात डान्स करताना साथ देत आहे. व्यक्तीला आनंदात नाचताना पाहून ट्रेनमधील प्रवासीही त्या डान्सचा आनंद लुटताना आणि व्हिडीओ शूट करताना दिसून आले आहेत. या अज्ञात व्यक्तीचा व्हिडीओ उत्तर रेल्वेनं त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. अज्ञात व्यक्तीचा ट्रेनमधील हा डान्स एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा… Video: ‘Physics Wala’ च्या शिक्षकाला भरवर्गात विद्यार्थ्याकडून चपलेने मारहाण! नेमकं कारण काय?

व्हिडीओ नक्की बघा :

मेट्रोत डान्स करणाऱ्या प्रवाशांना दिला सल्ला :

अनेकांना ट्रेनमध्ये शांत प्रवास करायला आवडतो. त्यातच काही जण ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात गप्पा मारतात किंवा उगीच आरडाओरडा करतात आणि आता तर काही जण चक्क डान्स व्हिडीओ शूट करतात; तर काही जण त्यांचे कौशल्य दाखवताना दिसून येतात. परंतु, याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना याचा त्रास होऊ शकतो. तर हीच गोष्ट लक्षात ठेवून उत्तर रेल्वेने प्रत्येक प्रवाशासाठी ही पोस्ट शेअर करून मोलाचा संदेश दिला आहे. त्यांनी या पोस्टमधून असा सल्ला दिला आहे की, भारतीय रेल्वे भारतीय लोकांचं प्रतिबिंब आहे. कृपया असे काही करताना सहप्रवाशांची काळजी घ्यायला विसरू नका. काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा व्हिडीओ पाहून, असा खास संदेश लिहून उत्तर रेल्वेने ही पोस्ट शेअर केली आहे.

ही पोस्ट उत्तर रेल्वे (Northern Railway) यांच्या अधिकृत @RailwayNorthern या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘भारतीय रेल्वे म्हणजे भारतीयत्वाचे प्रतिबिंब; कृपया तुमच्या सहप्रवाशांच्या आरामाची काळजी घ्यायला विसरू नका’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ट्रेनमध्ये नाचणाऱ्या व्यक्तीला पाहून अनेक जण संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच काही जण “यांच्यावर कारवाई कधी होणार?”, “यांच्यावर कारवाई करा; नाही तर ट्रेनमध्ये डान्स करणे एक ट्रेंड बनेल”, अशा अनेक कमेंट प्रवासी करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passenger dancing in a train video went viral northern railway gave valuable advice asp

First published on: 06-10-2023 at 19:03 IST
Next Story
Video : ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा रंग पडलाय फिका? तर ‘हा’ उपाय नक्की करून बघा….