Pak Man Shares International Airlines Video: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई थांबण्याचे काही नाव घेत नाही आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खूपच वेगळ्या वळणावर आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. आपल्याला माहिती आहे की, पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. कधी महागाईमुळे तर कधी आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो चर्चेत येत असतो. आता पाकिस्तानातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल…
सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल याची कल्पनाही करता येत नाही. कधी कधी आपण अशा काही गोष्टी पाहतो, ज्या आपल्या कल्पनेबाहेरच्या असतात. आपण जगाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या माणसांच्या जीवनाविषयी जाणून घेऊ शकतो. पाकिस्तानची स्थिती काय आहे हे तुम्हाला माहीत असेलच. दहशतवाद आणि गुन्हेगारीमुळे गरिबीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारच्या देशात जाण्यासही लोक घाबरतात. इंटरनेटवर पाकिस्तानशी संबंधित किस्सेही लोकांमध्ये रोजच चर्चेत असतात. जे केवळ लोकच पाहत नाहीत तर लोक एकमेकांबरोबर शेअरही करतात. अलीकडच्या काळात अशाच एका व्हिडीओची लोकांमध्ये चर्चा होत आहे, जिथे एका पाकिस्तानी प्रवाशाने आपल्या देशाच्या एअरलाइन्सची वाईट स्थिती जगासमोर आणली आहे.
(हे ही वाचा : पाकिस्तानी महिलेने सांगितले सीमेपलीकडील भारतीयांशी बोलण्याचे ९ अनोखे मार्ग; पाहा हा Video)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका प्रवाशाने शेअर केलेला व्हिडीओ तुम्ही पाहू शकता; ज्यामध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा (पीआयए) एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तेथील सत्य जगाला दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये धुळीने माखलेल्या आणि तुटलेल्या हँडलच्या खुर्च्या स्पष्टपणे दिसू शकतात. या व्हिडीओमध्ये त्यांनी या अनुभवाचे वर्णन भीतीदायक आणि सर्वात धोकादायक फ्लाइटपैकी एक असे केले आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, केबिन क्रू प्रवाशाला सांगतो की, येथे काहीही रेकॉर्ड करण्याची परवानगी नाही. मात्र, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी सीटवर पोहोचताच कॅमेरा ऑन करतो आणि खुर्च्यांवर साचलेल्या धुळीपासून ते तुटलेल्या हँडलपर्यंत सर्व काही दाखवू लागतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ अली खानने इन्स्टा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्याला लाखो लोकांनी पाहिले आहे. एका युजरने लिहिले, “या विमानात एकट्याने प्रवास करा”, तर दुसऱ्याने लिहिले, “तुम्ही खरोखरच मृत्यूला सामोरे गेले आहात.” इतर लोकांनीही यावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.