Premium

Video : चालती बोट सोडून खलाशी चढला पुलावर… दाखवला असा स्टंट; प्रवासी झाले थक्क

सोशल मीडियावर बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात चालती बोट सोडून खलाशी पुलावर चढतो आणि प्रवासी हे बघून थक्क होऊन जातात.

Passengers traveling by boat in which the sailor leaves the moving boat and climbs the bridge
(सौजन्य:ट्विटर/@fasc1nate)Video : चालती बोट सोडून खलाशी चढला पुलावर… दाखवला असा स्टंट; प्रवासी झाले थक्क

Viral Video : जगात अनेक ठिकाणं वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. फिरायला जाताना आपण नेहमीच रेल्वे, बस यांचा उपयोग करत असतोच; पण अनेकांना बोटीने प्रवास करायला खूप आवडते. अलिबाग, एलिफंटा लेणी आदी अनेक ठिकाणी फिरायला जाताना आपण अनेकदा बोटीने प्रवास करतो आणि समुद्राचा आनंद लुटतो. तर आज सोशल मीडियावरदेखील बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात चालती बोट सोडून खलाशी पुलावर चढतो आणि प्रवासी हे बघून थक्क होऊन जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला तुम्हाला कालव्यातून बोट जाताना दिसेल. बोटीत काही प्रवासी बसले आहेत आणि कालव्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. कालव्यातून बोट जाताना तिथे एक पूल दिसतो आणि पूल दिसताच प्रवासी डोकं खाली करतात. पण, बोट चालवणारा खलाशी मात्र बोटीत उभा असतो. बघता बघता खलाशी पुलावर चढतो आणि बोट कालव्यातून पुलाच्या पलीकडे जाते अगदी त्याच गतीने चालत जाऊन पलीकडे जाऊन पुलावरून उडी घेतो आणि बोटीत अगदी स्थिर जाऊन थांबतो. हे बघून बोटीत बसलेले प्रवासी टाळ्या वाजवून खलाश्याचं कौतुक करतात.

हेही वाचा…शाळकरी मुलीनं पकडला सर्वात खतरनाक साप, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

खलाशी बोट सोडून चढला पुलावर :

एक खलाशी चालत्या बोटीत असा अनोखा स्टंट करताना दिसून आला आहे. या दरम्यान बोटीवर बसलेले प्रवासी त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहतात. बोट पुलाखालून जाताच, खलाशी बोट सोडून पुलावर चढतो आणि नंतर पुलाच्या पलीकडे पोहोचतो आणि थेट बोटीवर उतरतो, अशा प्रकारे अनोखी उडी मारतो. खलाश्याचा लूकसुद्धा अगदी त्याच्या स्टंटसारखा अनोखा आहे. त्याने डोक्यावर एक विशिष्ट टोपी घालून, हातात मोठी काठी घेतली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ @fasc1nate यांच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ भारतातील नसून परदेशातील आहे, असे व्हिडीओ बघून कळून येत आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी आवडते क्षण कमेंटमध्ये नमूद करताना दिसून आले आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passengers traveling by boat in which the sailor leaves the moving boat and climbs the bridge asp

First published on: 21-09-2023 at 17:49 IST
Next Story
तमन्ना भाटियाच्या ‘कावला’ गाण्यावर चिमुकला थिरकला, लुंगी डान्सचा भन्नाट Video होतोय व्हायरल