Viral : 'पठाण झाला फ्लॉप'; 'त्या' चित्रपटगृहातील व्हायरल व्हिडीओमुळं सिनेविश्वात खळबळ | pathaan hui flop multiplex shocking video clip went viral on twitter social media trends pathaan movie flop memes viral nss 91 | Loksatta

Viral : ‘पठाण झाला फ्लॉप’; ‘त्या’ चित्रपटगृहातील व्हायरल व्हिडीओमुळं सिनेविश्वात खळबळ

पठाण चित्रपट फ्लॉप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर का रंगलीय? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Pathaan Movie Viral Video On Twitter
पठाण सिनेमा फ्लॉप झाल्याची चर्चा इंटरनेटवर रंगलीय. (Image-Twitter)

Pathaan Movie latest Viral Video : शाहरुख खान-दीपिका पादुकोण स्टारर पठाण चित्रपट २५ जानेवरीला प्रदर्शित झाला अन् पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर गाजला. एरव्ही दाक्षिणात्य चित्रपट जबरदस्त शैलीमुळं जगभरातील प्रेक्षकांवर छाप टाकताना दिसतात. पण आता सिनेविश्वात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. कारण शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शाहरुख खानने बॉलिवडूमध्ये तो किंग खान का आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमनेही पठाण चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्याने प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढलीय. पठाण पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर शेकडो प्रेक्षक रांगा लावताना दिसत आहेत. मात्र याचदरम्यान इंटरनेटवर व्हायरल झालेल्या काही पोस्टने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘पठाण फ्लॉप झाला’, असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु असून नेटकऱ्यांनी भन्नाट पोस्ट ट्वीटरवर व्हायरल केल्या आहेत.

दोन दिवसांतच १५० कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला पठाण चित्रपटाने जमवला आहे. बॉलिवडूमधील दिग्गज सेलिब्रिटी सुद्धा पठाण पाहण्यासाटी चित्रपटगृहात जाताना दिसत आहेत. पण सोशल मीडियावर पठाण फ्लॉप झाला या ट्रेंडमुळं सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं सक्सेसचा खरा रंग बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दाखवून दिला. विरोधकांनी काही ठिकाणी पठाण सिनेमाचा शो बंद करण्याचा प्रयत्नही केला होता. अशातच आता पठाण फ्लॉप झाला या ट्रेंडमुळं सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

नक्की वाचा – Viral Video : पठाण चित्रपटातील ‘तो’ सीन सुरु होताच शेकडो प्रेक्षकांनी स्क्रीनजवळ धाव घेतली अन् घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

२७ जानेवारीपासून #फ्लॉपहुईपठाण असे भन्नाट मिम्स नेटकरी ट्वीटरवर शेअर करताना दिसत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका चित्रपटगृहात प्रेक्षकांनी झुमे जो पठाण गाणं सुरु होताच जल्लोष सुरु केला होता. स्क्रीनवर सिनेमा सुरु असतानाच शाहरुख खानच्या चाहत्यांना पठाणची भुरळ पडली आणि टाळ्यांसह शिट्ट्यांचा गजर वाजू लागला. सिनेमाला जबदस्त प्रतिसाद दिल्याचे शाहरुख खानच्या चाहत्यांचे काही व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाले होते. मात्र, दोन दिवसांनंतर सोशल मीडियावर पठाण फ्लॉप झाला, असा ट्रेंड सुरु झाल्याने सोशल मीडियावर सर्वच चक्रावून गेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:46 IST
Next Story
दारु वाईटच…! नशेत दोन मित्र थेट लिफ्टच्या दरवाजातून खाली कोसळल्याचा धक्कादायक Video होतोय व्हायरल