Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी अनोखा जुगाड सांगताना दिसतो तर कधी कोणी धक्कादायक स्टंट करताना दिसतो. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक रेल्वेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जे दिसते ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही लोक ट्रेनमध्ये नाही तर ट्रेनच्या बाहेरच्या बाजूला इंजिनजवळ बसलेले दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. (people are travelling in a dangerous way by train shocking video goes viral)

सोशल मीडियावर रेल्वेमधील तुफान गर्दीचे व्हिडीओ व्हायरल होतात. गर्दीमुळे काही लोक ट्रेनमध्ये कुठेही बसताना दिसतात. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल कारण या व्हिडीओमध्ये लोक ट्रेनमध्ये नाही तर ट्रेनच्या बाहेरच्या बाजूला इंजिनजवळ आजुबाजूला जी जागा शिल्लक असते, तिथे बसले आहे. त्यांना निवांत बसलेले पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. अनेकदा लोक ट्रेनमध्ये उभ्याने प्रवास करताना दिसतात, कधी चालत्या ट्रेनमध्ये चढतात तर कधी उतरतात पण या लोकांनी तर सर्व सीमा पार केल्या आहेत. व्हिडीओ पाहून काही लोकांना वाटेल की यांना भीती वाटत नाही का? स्वत: च्याच जीवाशी खेळणाऱ्या या लोकांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

pune Porsche care accident minor accused
“मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरची धमकी!
Friends wake up friend in coma from 6 years ashray bhatia video viral
“ए उठ ना यार” ६ वर्षे मित्र कोमात; वाचवण्यासाठी मित्रांची धडपड, हृदयद्रावक VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा : पोर्श कारबरोबर शर्यतीची हौस बेतली जीवावर; स्टंटबाजीत तोल जाऊन बाईकसह हवेत उडाला अन्…अपघाताचा धडकी भरवणारा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : धोनीला विमानात पाहताच प्रवाशाने गुपचूप बनवला क्यूट Video; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “आजचा सर्वात…”

@Gulzar_sahab या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणू इच्छिता?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यमराज सुट्टीवर आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “मूर्ख लोक आहे.. आयुष्य एवढं स्वस्त नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “मौल्यवान जीवनाशी खेळताहेत” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी आयुष्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.