Viral Video Tiger: या जगात विविध प्रकारचे प्राणी आहेत. यातील काही प्राणी असे आहेत की माणसे त्यांना घरात ठेवतात आणि त्यांच्याशी खेळतात, तर दुसरीकडे असे अनेक प्राणी आहेत ज्यांचे नाव ऐकूनच लोकांना थरकाप सुटतो. वाघ, सिंह, साप, जंगली हत्ती अशा प्राण्यांपासून लोक दूर राहणे पसंत करतात. वाघ हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. एका फटक्यात तो कितीही मोठ्या प्राण्याचा फडशा पाडू शकतो. कारण वाघाची शरीररचनाच इतकी भारदस्त असते की, त्याच्यापुढे जंगलाचा राजा सिंहसुद्धा दीर्घकाळ टीकाव धरू शकत नाही.

वाघांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हीसुद्धा असे कितीतरी व्हिडीओ पाहिले असतील. पण कल्पना करा की, तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये मजा करत असाल आणि एखादा वाघ तिथे आला तर तुमचे काय होईल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असेच काहीसे दृश्य पाहायला मिळत आहे. अचानक तुमच्यासमोर अचानक वाघ आला तर तुमची काय अवस्था होईल? नक्कीच तुमच्या काळाजाचे ठोके चुकतील यात शंका नाही. सध्या असाच काहीसा प्रकार या व्हिडीओतील लोकांबरोबर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच
Puneri Pati Puneri Poster Goes Viral On Social Media
Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच
Tiger Fish Video Viral
पाण्यात माशाची चलाख चाल अन् पक्ष्याचा शेवट; माशानं असं काय केलं? पाहा Video

(हे ही वाचा: रेल्वेमध्ये स्वस्तात विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करताय? प्रवाशांनी फेक पॉवर बँक विक्रेत्याचा कसा केला भांडाफोड? एकदा Video पाहा)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?

सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. प्रत्येक जण त्यांचे फोटो क्लिक करत आहे. त्यानंतर एका व्यक्तीने मागे वळून पाहिले तर त्याच जलतरण तलावात एक वाघही पोहत असल्याचे त्याला दिसते. वाघाला पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तो जोरात ओरडतो अन् सर्वांचे लक्ष वाघाकडे जाते. जसे सर्वांचे वाघाकडे लक्ष जाते, तेव्हा सर्वांचाच थरकाप उडतो. त्यामुळे प्रत्येक जण जमेल तितक्या लवकर स्विमिंग पूलच्या बाहेर पडू लागतो. वाघाला बघून काही लोकांची तर प्रकृती बिघडते, जी व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसणारा वाघ हा पाळीव प्राणी असल्याचे दिसते, कारण त्याने कोणावरही हल्ला केला नाही आणि हा पूलही घरात बांधला आहे, त्यामुळे तेथे फक्त पाळीव प्राणी येऊ शकतो. व्हिडीओमध्ये दिसणारा वाघ पाळीव असल्यामुळे तो कोणालाही इजा करत नाही मात्र, वाघ हा पाळीव असला तरीही त्याला पाहून पूलमध्ये मस्ती करणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर thebillionaireslifestyle नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडीओला २४ लाख ४१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.