सोशल मीडिया ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला दररोज आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. विचित्र खाद्यपदार्थ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. कधी मॅगीमध्ये चॉकलेट तर कधी समोशा मंच्युरिअरचे कॉम्बिनेशन असतं. या संदर्भात आता एक नवीन डिश व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हिमाचलमध्ये वेगळ्या पद्धतीने बर्फ खाण्याचा ट्रेंड आहे, सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही बर्फ खाल्ला आहे का? अर्थात. आपण बर्फाचा गोळा खातो पण, तेव्हा त्यावर गोड सरबत टाकतो किंवा एखाद्या गोड रस किंवा सरबतमध्ये बर्फ टाकतो. पण कधी कोणी बर्फावर चिंचेची चटणी, तिखट, मीठ आणि साखर टाकून कधी बर्फ खाताना पाहिले आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हिमाचल प्रदेशमध्ये याच पद्धतीने बर्फ खाला जातो.

what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच
Orangutang visits the house viral video
Video : ओरँगउटांगने घरात शिरून आधी हात धुतले, नंतर… माकडाच्या ‘या’ करमातींनी व्हाल चकित

इंस्टाग्राम वर ruc.hhiiiiii नावाच्या युजरने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वात आधी एका मोठ्या प्लेटमध्ये बर्फाचा गोळा दिसत आहे. त्यानंतर ठेचून त्याचा तुकडे केले जात आहे. यानंतर त्यात चिंचेची चटणी, हिरवी चटणी, तिखट, मीठ आणि साखर घालून चांगले मिसळले जाते. यानंतर, ते एका वाडग्यात चमच्याने खायला दिले जाते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ७ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ८६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंटरनेटवर बर्फाची रेसिपी व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशी रेसिपी व्हायरल झाली आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे काहींना ही रेसिपी चाखून पाहायची आहे तर काहींनी या रेसिपीवर टिका केली आहे,