डिझायनर सब्यसाचीच्या मंगळसूत्राच्या नवीन जाहिरातीवर लोक संतापले, म्हणाले “मंगळसूत्र आणि कामसूत्र…”

सब्यसाचीच्या लक्झरी लेबलने रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन लॉंच केले आहे. याच्या जाहिरातीवरूनच वाद निर्माण झाला आहे.

sabyasachi mangalsutra campaign
सब्यसाची मंगळसूत्र कॅम्पेन (फोटो साभार: sabyasachiofficial/Instagram)

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसंची मुखर्जी त्यांच्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आके आहेत. लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी त्याने ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब केला आहे त्यामुळे ते ट्रोल होत आहे. सब्यसाचीने त्यांच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्राचा फोटो शेअर केला आहे. फॅशन डिझायनरच्या मॉडेलने डेनिम आणि ब्रा परिधान करून फोटो सेशन केले आहे, जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडले नाहीत.

सब्यसाचीच्या लक्झरी लेबलने रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन लॉंच केले आहे. मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार रुपयांपासून सुरू आहे. सब्यसाचीने त्याच्या इंस्टाग्रामवर मंगळसूत्रची जाहिरात करत फोटो शेअर केले आणि ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र’ असं कॅप्शनमध्ये लिहिले.

( हे ही वाचा: हरभजन ट्विटरवरच टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला भिडला, म्हणाला…! )

सब्यसाचीने एका पोस्टमध्ये ‘बेंगाल टायगर आयकॉन कलेक्शन ऑफ नेकलेस, व्हीव्हीएस डायमंड्स, ब्लॅक ऑनिक्स आणि कानातले आणि काळ्या आणि १८ कॅरेटमधील अंगठ्या’ असे लिहिले आहे. सब्यसाचीच्या जाहिरातीत एका महिलेने ब्रा आणि मंगळसूत्र घातले आहे, तर पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात.लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपला जीवनसाथी बनवतो. पवित्र नातं दिसू नये म्हणून काळे मोतीही घातले जातात. मात्र सब्यसाचीने ज्या पद्धतीने ते सादर केले ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.

( हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये भररस्त्यात शहामृगाची गाड्यांशी शर्यत! व्हिडीओ व्हायरल )

मंगळसूत्राच्या जाहिरातीत नग्नता दाखवल्याबद्दल सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. कोणीतरी याबद्दल तक्रार करण्यास सांगितले आहे. तर कोणीतरी सब्यसाचीवर बहिष्कार घालण्याची मागणी करत पोस्ट करत आहे.

सब्यसाचीला ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी ऑगस्टमध्ये, एच एंड एम ब्रँडसह फास्ट फॅशन प्रमोशनसाठी देखील तो ट्रोल झाला होता. तथापि, सोशल मीडियावर ब्रँड्सवर टीका करणे सामान्य आहे. अलीकडेच, फॅब इंडिया च्या दिवाळी कलेक्शन ‘जश्न-ए-रिवाज’ दाखवणारी जाहिरात बिंदी न घातल्याबद्दल अनेक ट्रोल झाल्यानंतर काढण्यात आली. त्याचवेळी करवा चौथवरील एका जाहिरातीमुळे डाबर ब्रँडही ट्रोल झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: People got angry over designer sabyasachis new mangalsutra advertising campaign saying mangalsutra and kamasutra ttg