Premium

पाकिस्तानात लोकांना नाही तर ट्रेनला पाहावी लागते लोक थांबण्याची वाट; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

Pakistan Railway Viral Video : पाकिस्तानात अशाप्रकारे ट्रेनला रस्त्यावरून जाणा-येणाऱ्या गाड्या थांबण्याची वाट पाहत फाटकातून पुढे जावे लागतेय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

people had to wait for the train in pakistan video viral
पाकिस्तानात लोकांना नाही तर ट्रेनला पाहावी लागते लोकं थांबण्याची वाट; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात (@choga_don twitter)

आजपर्यंत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखादी ट्रेन रेल्वे फाटकातून जात असते तेव्हा लोकांना फाटकाच्या बाहेर थांबून ट्रेन जाण्याची वाट पाहावी लागते. जेव्हा फाटकातून ट्रेन सुसाट वेगाने निघून गेल्यानंतर लोक फाटक क्रॉस करतात. पण पाकिस्तानात उलट पाहायला मिळत आहे. इथे चक्क ट्रेनला लोकं थांबण्याची वाट पाहावी लागत आहे. ट्रेनचा मोटरमॅन सतत हॉर्न वाजवतोय पण लोकांवर त्याचा काही फरक पडत नाही, या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन फाटकाजवळ उभी आहे आणि लोक तिथून आपापल्या कार, बाईकने फाटक क्रॉस करत आहेत. यावेळी मोटरमॅन लोकांना थांबवण्यासाठी सतत हॉर्न वाजवतोय पण लोकांवर त्याचा काही फरक पडत नाही. यावेळी काही लोक शहाणपणाने थांबतात. परंतु बहुतेक लोक ट्रेन थांबली याकडे दुर्लक्ष करत आपले वाहनं घेऊन पुढे निघून जातात. ट्रेन सतत हॉर्न वाजवत असतानाही अनेक लोक निष्काळजीपणे वागत असल्याचे दिसतेय. यावेळी दोन व्यक्ती हातात लाल आणि हिरवा झेंडा घेऊन येतात, यानंतर एक एक करु दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवत ट्रेनचा जाण्यासाठी वाट मोकळी करुन देतात.

हा व्हायरल व्हिडीओ @choga_don नावाच्या युजरने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, हा व्हिडीओ पाकिस्तानातील रेल्वेचा आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ५०८.१ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी पाकिस्तानची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे, एक युजरने लिहिले की, पाकिस्तानकडे गेट बांधण्यासाठीही पैसे नाहीत. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, त्यांची परिस्थिती कशी आहे? आणि मोठ्या-मोठ्या बाता करतात. तर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, त्यांच्या देशात गरिबी शिगेला पोहचली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People had to wait for the train in pakistan video viral sjr

First published on: 22-09-2023 at 10:47 IST
Next Story
VIDEO: चोरानं अंडरवेअरमध्ये लपवली दारुची बाटली; पुढच्याच क्षणी व्यक्तीसोबत घडलं भयानक