scorecardresearch

VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?

नेटकऱ्यांनी या चित्रपटातील एक मोठी चूक शोधून काढलीय. त्यामुळे हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.

VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?
(Photo: Twitter/ GumaanSingh)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर बऱ्याच दिवसानंतर ‘शमशेरा’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री वाणी कपूर, अभिनेता संजय दत्त हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. हा चित्रपट २२ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण रणबीर आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करू शकला नाही. सिनेमागृहात हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला. सिनेमागृहात हा सिनेमा चांगलाच फ्लॉप झाला होता. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी या चित्रपटातील एक मोठी चूक शोधून काढलीय. त्यामुळे हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.

सिनेमागृहात फ्लॉप झाल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. यशराजच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज केल्यानंतर हूशार नेटकरी मंडळी डोळे झाकून थोडी चित्रपट पाहील. हल्ली सोशल मीडियावरील मंडळी इतकी जागरूक असते की छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा यांच्यापासून लपून राहत नाही. मग चित्रपट तर दूरची गोष्ट आहे. या नेटकऱ्यांनी रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील एक अशी गोष्ट शोधून काढली जी तुमच्याही लक्षात आली नसेल.

आणखी वाचा : ‘आ भैंस मुझे मार..’! म्हशीसमोर मुलगी नाचू लागली, मग पुढे काय घडतं ते पाहा VIRAL VIDEO

‘शमशेरा’ या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळतो. या चित्रपटाच्या एका फाईट सीक्वेन्समध्ये ‘हिरोईन’च्या मांडीवर नवजात बालक दाखवण्यात आले होते. पण यात ते बाळ नसून केवळ कपडे असल्याचे नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. तुम्ही जर पाहिलं तर कपड्यालाच एखाद्या बाळाला गुंडाळतो तसं गुंडाळून अभिनेत्री वाणी कपूरने हातात पकडलेलं स्पष्टपणे दिसतंय. इतकी छोटी गोष्ट कुठे प्रेक्षकांच्या लक्षात येणार आहे, असा विचार कचादित दिग्दर्शकांनी आणि चित्रपटाच्या टिमने केला असावा. पण सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यांना हलक्यात घेऊन कसं चालेल? ही मंडळी इतकी चाणाक्ष असते की एकूण एक गोष्टीवर यांची नजर असते. एकदा यांच्या नजरेस अशा गोष्टी पडल्या की मग ते ट्रोल केल्याशिवाय काही राहत नाहीत.

आणखी वाचा : सत्तेची ‘नशा’! किरकोळ गोष्टीवरून मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरला मारली चपराक, CM नी मागितली माफी

सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. @GumaanSingh नावाच्या एक ट्विटर यूजरने चित्रपटातल्या या मोठ्या चूकीचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर या व्हिडीओवर प्रतिक्रिया आणि वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊसच पडू लागला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख २२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर साडेपाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळे विनोद आणि मीन्स शेअर करू लागले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाणी साचलेल्या खड्ड्याच्या पलीकडे जाण्यासाठी आजीला ट्रक चाकलाने कशी मदत केली पाहा…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : लेकीला पोटाशी घेऊन फूड डिलिव्हरी करतेय ही महिला, VIRAL VIDEO पाहून जनता झाली भावूक

“चित्रपटावर, अभिनेता आणि अभिनेत्रीवर इतके करोडो रूपये खर्च करण्याऐवजी एक साधी बाहूली तरी खरेदी करायची होती”, अशा भावना आता नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. काही यूजर्स म्हणत आहेत, शमशेराचं बजेट १५० कोटी रुपये इतकं होतं. पण हातात दिडशे कोटी रुपये असताना सुद्धा साधी एक ५० रुपयांची बाहुली सुद्धा घेता आली नाही का? असा प्रश्न देखील विचारत आहेत. काही युजर्सनी त्याची खिल्ली उडवली तर काहींनी म्हटलं की, बॉलीवूडवाल्यांना काय झालंय कळत नाही, अजिबात मेहनत घेत नाहीत! त्याचवेळी दुसऱ्या एका युजरने लिहिले की, बाळ स्वतःचं युद्ध लढत आहे. बाकी तुम्ही बघा आणि सांगा चित्रपट पाहताना ही चूक तुमच्या लक्षात आली की नाही?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People spotted the most obvious error in shamshera watch viral video prp

ताज्या बातम्या