फिरायला गेल्यावर किंवा मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर अनेक जण फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सेल्फी किंवा फोटो काढणं हा एक ट्रेंड झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण, कधी कधी चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या जागेवर सेल्फी किंवा फोटो काढण्याचा मोह अनेकांना महागात पडतो. आज सोशल मीडियावर, असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. काही तरुण मंडळी ट्रेनची वाट बघत उभी असतात. यादरम्यान ते त्यांच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत असतात. तितक्यात समोरून एक एक्स्प्रेस ट्रेन येते आणि एका अज्ञात व्यक्तीला धडकून पुढे निघून जाते.

हा व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. काही प्रवासी ट्रेनची वाट बघत उभे आहेत.या प्रसंगी ट्रेनची वाट बघत उभी असणारी काही तरुण मंडळी फोनमध्ये सेल्फी काढत आहेत. सेल्फी काढता काढता ते इतके रमून जातात की, आपण रेल्वे रुळाच्या बाजूला उभे आहोत याचेही भान त्यांना राहत नाही. काही वेळात रेल्वे रुळांवर एक एक्स्प्रेस ट्रेन येते आणि जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करते. ट्रेन येतेय हे पाहून काही तरुण मंडळी बाजूला होतात. पण, तरुण मंडळींमधील एक व्यक्ती ट्रेन येतेय हे पाहूनसुद्धा तिथेच उभी राहते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा…शिमला फ्लाइंग फेस्टिव्हलमध्ये पॅराग्लायडर झाला क्रॅश; थोडक्यात वाचला जीव; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

काही जण मौजमजा करण्यासाठी जीवावर बेतणारे स्टंट करीत असतात. आपल्याला इजा किंवा मोठी दुर्घटना होऊ शकते याचेही अवधान अनेकांना नसते. असंच काहीसं या व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये दिसतंय की, ट्रेन येतेय हे पाहून सेल्फी काढणाऱ्या तरुण मंडळींमधील अनेक जण बाजूला होतात. पण,हे पाहूनसुद्धा एक व्यक्ती तिथेच उभी असते आणि समोरून ट्रेन येते. ही व्यक्ती रेल्वे रुळाच्या अगदी बाजूलाच उभी असते आणि त्यामुळेच ट्रेन त्या व्यक्तीला धडकून पुढे निघून जाते हे पाहून तुम्हालाही काही क्षणांसाठी आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vidvortex या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने, “लोक आपला जीव धोक्यात का घालतात?” अशी कमेंट केली आहे. आजकाल प्रसिद्ध होण्यासाठी तरुण मंडळीदेखील धावत्या ट्रेनमध्ये लटकतात, स्थानक येण्याआधी ट्रेनमधून उडी मारतात, असे अनेक विचित्र स्टंट करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. वारंवार अनेक सूचना देऊनसुद्धा या व्हिडीओत पाहिल्याप्रमाणे अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी मुद्दाम अशी जीवघेणी कृत्यं करताना दिसून येतात.