सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून काही लोकांच्या अंगावर काटा आला आहे, तर काहींना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहेत. हे लोक पोहत असतानाच अचानक स्विमिंग पूलमध्ये एक वाघ उडी मारतो आणि त्यानंतर जे काही होतं ते पाहून अनेकांना हसावं की रडाव हा प्रश्न पडला आहे. कारण वाघ दिसताच पोहण्याचा आनंद घेणारे लोक क्षणात स्विमिंग पूलमधून जीवाच्या भीतीने बाहेर पळायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सगळ्यात धोकादायक प्राणी म्हणून वाघाला ओळखलं जातं, कारण वाघाने एकदा भक्ष्यावर नजर टाकली की काहीही झाले तरी तो त्याला आपल्या तावडीतून सुटू देत नाही. त्यामुळेच जंगलातील अनेक प्राणी वाघासमोर जाणं टाळतात. जिथे वन्य प्राणी वाघासमोर जायला घाबरतात तर माणसं वाघाचं नाव ऐकताच घाबरतात. अशातच जर अचानक तुमच्यासमोर अचानक वाघ आला तर तुमची काय अवस्था होईल? नक्कीच तुमच्या काळाजाचे ठोके चुकतील यात शंका नाही. सध्या असाच काहीसा प्रकार या व्हिडीओतील लोकांबरोबर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अंघोळीसाठी लोकांनी स्विमिंग पूलमध्ये गर्दी केलेली असतानाच अचानक एक वाघ स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो ज्यामुळे लोक जीवाच्या भितीने इकडे तिकडे पळाताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा धक्कादायक आणि तितकाच मजेशीर व्हिडिओ दुबईचा असल्याच सांगितलं जात आहे. स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करणाऱ्या लोकांबरोबर हा एक प्रँक करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये दिसणारा वाघ पाळीव असल्यामुळे तो कोणालाही इजा करत नाही. वाघ हा पाळीव असला तरीही त्याला पाहून पूलमध्ये मस्ती करणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या नेटकरी या व्हायरल व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.