Premium

स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची हौस पडली महागात, अचानक पाठीमागून आला वाघ…, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

tiger most trending video
स्विमिंग पूलमध्ये वाघाने उडी मारली अन्… (Photo : Instagram)

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून काही लोकांच्या अंगावर काटा आला आहे, तर काहींना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहेत. हे लोक पोहत असतानाच अचानक स्विमिंग पूलमध्ये एक वाघ उडी मारतो आणि त्यानंतर जे काही होतं ते पाहून अनेकांना हसावं की रडाव हा प्रश्न पडला आहे. कारण वाघ दिसताच पोहण्याचा आनंद घेणारे लोक क्षणात स्विमिंग पूलमधून जीवाच्या भीतीने बाहेर पळायला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सगळ्यात धोकादायक प्राणी म्हणून वाघाला ओळखलं जातं, कारण वाघाने एकदा भक्ष्यावर नजर टाकली की काहीही झाले तरी तो त्याला आपल्या तावडीतून सुटू देत नाही. त्यामुळेच जंगलातील अनेक प्राणी वाघासमोर जाणं टाळतात. जिथे वन्य प्राणी वाघासमोर जायला घाबरतात तर माणसं वाघाचं नाव ऐकताच घाबरतात. अशातच जर अचानक तुमच्यासमोर अचानक वाघ आला तर तुमची काय अवस्था होईल? नक्कीच तुमच्या काळाजाचे ठोके चुकतील यात शंका नाही. सध्या असाच काहीसा प्रकार या व्हिडीओतील लोकांबरोबर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अंघोळीसाठी लोकांनी स्विमिंग पूलमध्ये गर्दी केलेली असतानाच अचानक एक वाघ स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो ज्यामुळे लोक जीवाच्या भितीने इकडे तिकडे पळाताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People were bathing in the swimming pool then suddenly a tiger came jumping you will also be amazed by the viral video jap

First published on: 26-09-2023 at 10:27 IST
Next Story
रात्री ऑफिसच्या सीसीटीव्हीत कैद झालं भयानक दृश्य; नाईट शिफ्ट करत असाल तर VIDEO पाहून उडेल थरकाप