ट्रकवर ठेवलेला हा विशालकाय टायर तुम्ही हैराण व्हाल! पाहा हा VIRAL VIDEO

तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या डिझाईन्सचे टायर पाहिले असतील, पण इतका मोठा टायर कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत.

ट्रकवर ठेवलेला हा विशालकाय टायर तुम्ही हैराण व्हाल! पाहा हा VIRAL VIDEO
(Photo: Instagram/ bviralreels)

एक काळ असा होता की तेव्हा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी किंवा घोडागाडीचा वापर करत होते. पण हल्लीच्या युगात एका पेक्षा एक भन्नाट गाड्या मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. आपल्या डोळ्यादेखत काही सेकंदात या गाड्या भुर्रर्रकन कधी निघून जातात, ते समजत नाही. पण आधीच्या आणि आताच्या गाड्यांमध्ये एक गोष्ट सारखीच राहिली ती म्हणजे गाड्यांची चाके. आधीच्या काळात बैलगाडी आणि घोडागाडीमध्ये चाके होती आणि आता तर चाकांशिवाय आता वाहनाने प्रवास करणे अशक्यच. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या डिझाईन्सचे टायर पाहिले असतील, पण इतका मोठा टायर कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ट्रकवर विशालकाय टायर ठेवण्यात आलेला आहे. आता इतक्या मोठ्या टायरचा वापर नक्की कशासाठी केला जात असेल, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून ट्रेक भरधाव वेगाने धावताना दिसतोय आणि त्यावर मोठ-मोठे टायर ठेवण्यात आले आहेत. हे मोठाले टायर नक्की कोणत्या गाडीचे आहेत, असा सवाल सारेच जण विचारत आहेत. टायरचा इतका मोठा आकार पाहून लोक हैराण झाले आहेत. या ट्रकच्या बाजूने जाण्याऱ्या एका गाडीतून व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केलाय. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आणखी वाचा : गाढ झोपेत असलेल्या माणसाकडे ही मुलं गुपचूप साऊंड बॉक्स घेऊन गेले आणि…मग काय झालं, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क विमानांमध्ये अगदी लोकलसारखीच हाणामारी, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

हा हैराण करून सोडणारा हा व्हिडीओ bviralreels नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘इतके मोठे टायर ज्या ट्रकला लावण्यात येतील त्या ट्रकचा अंदाज लावा’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ७ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत २८ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. लोकांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काही युजर्सनी तर हे टायर ज्या ट्रकला लावण्यात येतील, त्या ट्रकला ‘मॉन्सटर ट्रक’ असं नाव दिलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People were surprised to see the giant tyre on the truck shocking video viral prp

Next Story
चक्क विमानांमध्ये अगदी लोकलसारखीच हाणामारी, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…
फोटो गॅलरी