Maharashtra SSC Result 2023: दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण क्षण असतो. या परीक्षेवरुन त्याचे भविष्य ठरत असते. गेल्या काही वर्षांध्ये दहावीच्या परीक्षेचे रुपांतरण एका स्पर्धेमध्ये झाले आहे. लाखो स्पर्धेक असलेल्या या स्पर्धेमध्ये आपण सरस ठरावे असे प्रत्येकाला वाटत असते. पालकांना देखील आपल्या मुलाला ९० किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळावेत असे वाटत असते. आजकाल दहावीमध्ये तब्बल १०० टक्क्यांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या आपण ऐकत असतो. या अशा स्थितीमध्ये ठाण्यातल्या एका विद्यार्थ्याच्या नावाची आणि त्याच्या रिझल्टची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. असं का घडतंय जाणून घेऊयात..

ठाण्यातील उथळसर विभागामध्ये राहणाऱ्या विशाल कराड या विद्यार्थ्याने दहावीच्या प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवले आहेत. असे केल्याने तो ३५ टक्के काठावर पास झाला आहे. या अजबगजब विक्रमामुळे सध्या विशाल कराड खूप चर्चेत आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने ‘मी दहावीची परीक्षा पास होईन असं मला वाटत नव्हतं’, असे म्हटले होते. दहावीमध्ये असतानाच विशाल उथळसर येथे सहकुटुंब राहायला गेला होता. विशालचे वडील हे रिक्षाचालक आहे. उदरनिर्वाहासाठी ते दिवसभर रिक्षा चालवतात. विशालच्या आई एका हाताने अपंग आहेत. असे असूनही त्या धुणीभांडीचे काम करुन त्याच्या वडिलांना आर्थिक सहकार्य करतात. ‘माझ्या आईवडिलांमुळे ही परीक्षा पास झालो’ असे विशालने एका मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला, एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला आहे. दहावीनंतर आता मला पुढील शिक्षण घ्यायचे आहे. मला भविष्यात इंजिनिअर किंवा कलेक्टर व्हायचे होऊन घरची स्थिती सुधारायची आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

आणखी वाचा – Maharashtra SSC Result 2023 : जुळ्या बहिणींची कमाल, दहावीत मिळविले सारखेच गुण

विशालच्या आईवडिलांना त्याने दहावीमध्ये ३५ टक्के मिळवले याचा अभिमान आहे. आपला मुलगा काठावर का होईना पास झाला. त्याला त्याच्या गुणांमुळे प्रसिद्धी मिळत आहे यामुळे विशालचे वडील अशोक कराड खुश आहेत. ‘बरेचसे पालक आपल्या मुलाने परीक्षेत जास्त गुण मिळवले म्हणून आनंदी आहेत. माझ्या मुलाला ३५ टक्के मिळाले यापेक्षा तो दहावीची परीक्षा पास झाला याचं आम्हाला कौतुक आहे’ असे अशोक कराड यांनी म्हटले आहे.