Flashback 2022 Viral Beauty Trends: अजून एक वर्ष संपत असताना, चांगलं, वाईट आणि ठीकठाक अशाच सगळ्याच आठवणींची उजळणी करण्याचा काळ म्हणजेच डिसेंबरचा शेवटचा आठवडा. आजच्या या लेखात आपण २०२२ मध्ये मध्ये राहिलेल्या सर्वच विचित्र ब्युटी ट्रेंड्स विषयी माहिती घेणार आहोत. दरवर्षी प्रमाणे, २०२२ मध्ये देखील सोशल मीडियावर अनेक ट्रेंड आले आहेत. अनेकांनी त्यांच्या नॅचरल ब्युटी ट्रेंड्सने आपल्याला चकित केले तर याच्या अगदी विरुद्ध थक्क करणारे ट्रेंड्स सुद्धा यावर्षी येऊन गेले. चला तर मग यातील सगळ्यात शॉकिंग ट्रेंड कोणता होता हे पाहुयात..

२०२२ व्हायरल स्किनकेअर व ब्युटी ट्रेंड्स

मासिक पाळीच्या रक्ताने फेशियल

बार्सिलोनाची (Barcelona) रहिवासी असलेल्या डेरियाने (Deria) हा ट्रेंड सुरू केला. जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा पिरियड कपमध्ये रक्त जमा केले जाते व ते चेहऱ्याला लावले जाते असे डेरियाचे म्हणणे होते. चेहऱ्यावर पीरियड ब्लड लावल्याने त्वचा निरोगी राहते असं म्हणत #moonmasking आणि #menstrualmasking या हॅशटॅगसह हा ट्रेंड सुरु करण्यात आला होता. वेल हेल्थच्या अहवालानुसार,आपल्या नसांमधून जाणारे रक्त आणि पीरियड्सचं रक्त सारखेच असते. परंतु पीरियड्सच्या रक्तामध्ये एंडोमेट्रियमपासून प्राप्त झालेल्या ऊतकांचा समावेश होतो.

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
What caused decline in production of cashew nuts in Konkan Unseasonal rains along with the impact of low rates
विश्लेषण : कोकणात ‘काजू बी’च्या उत्पादनात घट कशामुळे झाली? अवकाळी पावसाबरोबरच कमी दराचा फटका?
Bowlers are allowed to bowl two bouncers in an over batting more challenging in this year IPL What is other rule changes
एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?

डॉ पराग तेलंग, सल्लागार कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जन, मुंबई, यांनी सांगितले की, चेहऱ्यावर मासिक पाळीतील रक्ताचा वापर केल्यास हानी होऊ शकते. कारण मासिक पाळीच्या रक्तामध्ये गर्भाशयाच्या ऊती आणि बॅक्टेरिया असतात. चेहऱ्यावर हे रक्त वापरणेही हानिकारक ठरू शकतं. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

ब्लिच केलेल्या भुवया

तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या भुवयाशिवाय तुम्ही कसे दिसाल? ब्लीच केलेल्या भुवया ट्रेंड किम कार्दशियन आणि काइली जेनरपासून लिझो आणि बेला हदीदपर्यंत अनेकांनी फॉलो केला होता. ओजस राजानी, सेलिब्रिटी मेकअप, हेअर आणि फॅशन स्टायलिस्ट सांगतात की “भुव्यांना ब्लीच केल्याने भुवया चांगले दिसण्यास मदत होऊ शकते जर तुम्हाला ती थ्रेड करायची नसेल. ब्लीच हा मुळात तुमच्या त्वचेचा रंग असतो आणि तो तुमच्या त्वचेत मिसळतो आणि भुवया सूक्ष्म दिसतात. मात्र यात सर्वाधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

टर्कीसारखे दात

केटी प्राइस, केरी काटोना आणि जॅक फिंचम या सेलिब्रिटींनी हा ट्रेंड फॉलो केला होता. सोप्या भाषेत सांगायचे तर, या ट्रेंडमध्ये खूप पांढरे, आश्चर्यकारकपणे चौकोनी आणि आकर्षक दात मिळविण्यासाठी सर्जरी केली जाते. डॉ सुमन यादव, दंत विभाग प्रमुख, हीलिंग ट्री हॉस्पिटल इंद्रपुरम, गाझियाबाद सांगतात की, ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायक असते व या प्रक्रियेमुळे मज्जातंतू/ऊतींचे नुकसान, तीव्र वेदना, सूज, चघळण्यात अडचण, चिडचिड व जळजळ जाणवू शकते.

रडका मेकअप

रडून सुजलेला चेहरे लपवण्यासाठी मेकअप करतात हे आपण ऐकलं असेल पण 2022 मध्ये ‘क्रायिंग गर्ल’ मेकअप ट्रेंड हिट झाला होता. याची सुरुवात सौंदर्यप्रेमी Zoe Zoe Kim Kenealy च्या TikTok पासून झाली. यात लालसर मेकअप, अश्रू आणि सुजलेला लुक कसा मिळवायचा याबाबत सांगण्यात आले .

तुम्हाला यातील कोणता ट्रेंड सर्वात विचित्र वाटला? तुम्हीही असे ट्रेंड ऐकले आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.