नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी लोक लांब पळतात. कारण काही साप इतके धोकादायक असतात की त्यांनी दंश करताच माणसाचा जागीच जीव जाऊ शकतो. तसेच काही वेळा लोक घाबरुन साप आपल्या परिसरात दिसला तरी त्याला मारतात. पण सध्या सापाशी संबंधीत एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ज्यामध्ये एका व्यक्तीने उन्हाळ्यात माणुसकी म्हणून चक्क तहानलेल्या सापाला पाणी पाजण्याचे धाडस केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माणुसकीसाठी व्यक्तीने स्वतःचाही जीव धोक्यात घातला आहे. व्हिडीओमध्ये एक साप दिसत आहे, या सापाचा आकारही बऱ्यापैकी मोठा आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे या तहानलेल्या सापाला व्यक्ती पाणी पाजत आहे. तो दूरुन घाबरत घाबरत त्याला पाणी पाजत असल्याचं दिसतंय. व्यक्ती पाण्याच्या स्प्रिंकलर पाईपने सापाला पाणी पाजत आहे. हे दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहतो. हा शॉकिंग व्हिडओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाणी पाजत असताना कधीही आपल्यावर हल्ला करु शकतो याची कल्पना त्या व्यक्तीला असवी त्यामुळे सावधगीरी बाळगत हआहे.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: नवरदेवाच्या कारला ट्रक चालकाची मुद्दाम धडक, ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.