scorecardresearch

Premium

चालत्या कारच्या स्टीयरिंगमध्ये अडकलं डोक! मित्र असून पाहत राहिले, Video पाहून व्हाल थक्क

Viral video: गाडी चालवताना चक्क ड्रायव्हारचं डोकं गाडीच्या स्टीयरिंगमध्ये अडकलं. विश्वास बसत नाहीये ना मग हा व्हिडीओ पाहा.

person head badly stuck in car steering
ड्रायव्हारचं डोकं गाडीच्या स्टीयरिंगमध्ये अडकलं

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा नेटकऱ्यांचे डोके चक्रावून जाते. इंटरनेटवर एखादी गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. यातील काही व्हिडीओ धक्कादायक असतात, मात्र काही इमोशनल असतात. तर काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की ते पाहून आपला हसण्यावर कंट्रोलच रहात नाही.  रोज काहीतरी नवीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतं. त्यामुळे नेटकरीही जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतीत करत असतात. अनेक मजेशीर, विचित्र, धोकादायक, भयानक, भावुक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. गाडी चालवताना चक्क ड्रायव्हारचं डोकं गाडीच्या स्टीयरिंगमध्ये अडकलं. विश्वास बसत नाहीये ना मग हा व्हिडीओ पाहा.

आता तुम्ही म्हणाल स्टीयरिंगमध्ये कसं काय डोकं अडकू शकतं, मात्र या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीचे डोके स्टेअरिंगच्या आत अडकल्याचे दिसत आहे. त्याचे डोके बाहेर काढण्याचा तो वारंवार प्रयत्न करत आहे, पण त्यात यश येत नाही. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच प्रश्न आहे की, स्टीअरिंग होलमध्ये कुणाच्या डोक्यात जाण्यासाठी पुरेशी जागा नाही, मग या व्यक्तीसोबत हे कसे घडले? कारच्या मागच्या सीटवर एक तरुण बसलेला दिसत आहे, आपल्या मित्राला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचं सोडून तोही मदत न करता हसत आहे. या व्हिडीओमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जो व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे, तोही त्याला मदत करण्याएवजी व्हिडीओ बनवत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ इंडोनेशियाचा असल्याचा दावा केला जात असला तरी.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Mumbai Road Accident Video: मुंबईत दोन बसची जोरदार धडक; डॉक्टरचा जागीच मृत्यू, Video व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. तसेच मित्रांवरही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Person head badly stuck in car steering people asked how did this happen video viral on social media srk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×