कुत्रा हा माणसाचा सर्वांत चांगला मित्र आहे, हे म्हणतात ते उगीचच नाही. नुकतीच एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या वाक्याचा प्रत्यय आला आहे. न्यू हॅम्पशायर येथील लेबनॉनमध्ये एका कुत्रीने आपल्या अपघातग्रस्त मालकाचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. मालकाचे प्राण वाचवण्यासाठी या कुत्रीने केलेली धडपड पाहून सर्वच भावून झाले आहेत. ऑनलाइन हिरो म्हणून या कुत्रीला गौरवण्यात येतंय. न्यू हॅम्पशायर स्टेट पोलिसांनी (NHSP) लेबनॉनमधील न्यू हॅम्पशायर-व्हरमाँट बोर्डर येथे आंतरराज्य ८९ मार्गावर स्थित वेटरन्स मेमोरियल ब्रिजवर एका कुत्रीला मदतीच्या शोधात भटकताना पाहिले. पोलिसांनी या कुत्रीच्या हालचालींना प्रतिसाद दिला, पण त्यांना हे माहित नव्हते की यामागे नक्की काय अर्थ आहे.

ही कुत्री जर्मन शेफर्ड प्रजातीची होती. या कुत्रीचं नाव टिन्सले असं असल्याचं समोर आलं. पोलिसांना या कुत्रीच्या जवळ जायचं होतं पण ही कुत्री मात्र आंतरराज्यीय मार्ग ८९वर उत्तरेकडे धावत राहिली. पोलीस देखील त्याच्या मागोमाग धावू लागले. कुत्रीने पोलिसांना अपघात झालेल्या ठिकाणी पोहचवले. त्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांना तिथे एक उलटलेला ट्रक दिला. पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांच्या लक्षात आले की या ट्रकमधील दोन्ही प्रवासी वाहनातून बाहेर पडले होते, आणि ते गंभीररित्या जखमी झाले होते. टिन्सलेच्या हावभावामुळे पोलिसांना या जखमी व्यक्तींचा वेळीच शोध लावता आला. दरम्यान, पोलिसांनी फेसबुकवर या संदर्भात एक पोस्ट टाकली आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

एनएचएसपी लेफ्टनंट डॅनियल बाल्डसारे यांनी या घटनेबाबत WCVB5ला अधिक माहिती दिली. ते म्हणाले,’ती कुत्री पोलिसांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. कारण ती पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती परंतु ती पूर्णपणे त्यांच्यापासून दूर जात नव्हती. ती पोलिसांना त्याच्या मागे येण्यासाठी खुणवत होती. पोलिसही तिचा पाठलाग करत होते. परंतु घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना विश्वासच बसला नाही.’

बाल्डसारे यांनी या घटनेची तुलना वास्तविक जीवनातील ‘लॅसी’ कथेशी केली आहे. या कथेतही एक कुत्रा संकटात सापडलेल्या लोकांसाठी मदत घेऊन येतो. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एकाचं नाव कॅम लॉंड्री असं होतं. नंतर त्याची ओळख टिन्सलेचा मालक म्हणून झाली. लॉंड्रीने या कुत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटलंय की, ही माझी लहानशी देवदूत आहे. हे करण्यासाठी तिच्याकडे जी बुद्धी आहे त्याला एक चमत्कार म्हणता येईल.’

पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केलेले फोटो भीतीदायक असले तरीही या अपघातात जखमी झालेले लोक आता सुरक्षित आहेत. अहवालानुसार, हार्टफोर्ड ईएमटी, ज्यांनी कॉल अटेंड केला त्यांनी या मदत कार्याच्या गतीचे श्रेय या कुत्रीला दिले आहे. हार्टफोर्ड फायर डिपार्टमेंटचे कॅप्टन जॅक हेजेस यांनी न्यूज आउटलेटला सांगितले की, ते जेव्हा रुग्णांचे उपचार करत होते तेव्हा ही कुत्री तिच्या मालकाच्या शेजारीच शांतपणे बसली होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर लाँड्री आणि टिन्सले एकमेकांना प्रेमाने भेटले. लॉन्ड्रीने टिन्सलेला त्याच्या ट्रकचा सह-पायलट म्हटले आहे. तसेच तिच्या या पराक्रमाची तिला चांगलं खाद्य देणार असल्याचंही म्हटलंय.