scorecardresearch

Premium

मालकीण गोदावरी नदीत वाहून गेली! कुत्रा चपलेजवळ २२ तास वाट बघतच राहिला, पण…व्हिडीओनं लोकांना रडवलं

कुत्र्याने महिलेनं ठेवलेल्या चपलेजवळ २२ तास तिची वाट बघत मुक्काम ठोकला. कुत्र्याचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Pet Dog On Godavari Bridge Video Viral
गोदावरी पूलाजवळ महिलेची वाट पाहणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ. (Image-Twitter)

Pet Dog Waits For Woman On Godavari Bridge Video Viral : आंध्रप्रधेशच्या आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील गोदावरी पूलाजवळ एका महिलेनं आत्महत्या केल्यानं खळबळ माजलीय. परंतु, महिलेलसोबत असलेल्या पाळीव कुत्र्याच्या एका व्हायरल व्हिडीओनं अनेकांचं हृदय पिळवटून टाकलं आहे. कारण घरातील मालकिण पूलावर आल्यापासून गायब झाली आहे, याची जाणीव त्या कुत्र्याला झाली. त्यानंतर या कुत्र्याने महिलेनं ठेवलेल्या चपलेजवळ २२ तास तिची वाट बघत मुक्काम ठोकला. कुत्र्याचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनाही रडू कोसळल्याच्या प्रतिक्रिया इंटरनेटवर उमटत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, महिलेनं नदीत उडी मारल्यानंतर ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. मंदांगी कांचना (२२) असं या मृत महिलेचं नाव असून ती यानम फेरी रोड येथील रहिवासी होती. महिलेच्या आत्महत्येचं कारण तपासलं जात आहे, अशी माहिती यानम पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली. ही महिला इविनिंग वॉकला जात असताना यानम आणि येदूरलंका याचदरम्यान जीएमसी बालायोगी पूलाजवळ ती अचानक थांबली. त्यानंतर तिने गोदावरी नदीत उडी मारली. त्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांसमोरच ही धक्कादायक घटना घडली.

Hemil Mangukiya died in russia
अडीच लाख रुपये पगारासाठी रशियन सैन्यात गेला; युक्रेन युद्धात गुजराती तरुणाचा दुर्दैवी अंत
pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
pregnant woman in Miraj taluka
सांगली : अडलेल्या महिलेसाठी वाटही अडली
Delhi Airpot
“तिच्या बॅगेत सेक्स टॉय, अशा महिलांना…, दिल्ली विमानतळावरील ‘त्या’ घटनेतील मूक साक्षीदाराला नक्की कसली खंत?

नक्की वाचा – CCTV Video: हेल्मेट न घालणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू, भरधाव कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर

इथे पाहा व्हिडीओ

त्यानंतर काही लोकांनी तातडीनं महिलेल्या वाचवण्यासाठी बचाव पथकाला संपर्क केला. पण दुर्देवाने ती महिला पाण्याचा मोठ्या प्रवाहासोबत वाहून गेली. मात्र, तिच्यासोबत असलेला कुत्रा त्या पूलाजवळ तिची वाट बघत राहिला. रात्रभर हा कुत्रा त्या महिलेची वाट बघत होता. मात्र, त्या कुत्र्याला त्याची मालकीण सापडली नाही. त्यानंतप महिलेच्या आईने त्या कुत्र्याला घरी नेलं. हदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांनाही भावनिक केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pet dog seats near womans footwear and waits 22 hours but woman jumped into godavari river netizens cried heartbreaking video viral nss

First published on: 18-07-2023 at 17:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×