Premium

जिद्दीला सलाम! दिवसभर फार्मा कंपनीमध्ये करते जॉब, ऑफिस सुटताच विकते पास्ता, ‘या’ तरुणीची प्रेरणादायी कथा एकदा वाचा

सोशल मीडियावर एक तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत जी, सकाळी नोकरी करते आणि संध्याकाळी फूड स्टॉलवर चालवते.

pharma employee opens pasta stall in evening on weekends to follow her passion goes viral
नोकरी करून फूड स्टॉल चालवणाऱ्या तरुणीचा प्रेरणादायी व्हिडीओ (फोटो – इंस्टाग्राम, योगेश जीवरानी )

अनेकदा जबाबदारीच्या ओझ्याखाली आपली आवड-निवड बाजूला ठेवावी लागते. कित्येकांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत नाही. काही जणांना स्वत: च बिझनेस करायचा असतो पण परिस्थितीमुळे त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण काही लोक असे असतात आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी त्यांचा सामना करतात आणि आपले स्वप्न पूर्ण करतात. आपल्या स्वप्न पुर्ण करण्यासाठी हे लोक दिवस-रात्र कष्ट करू शकतात. अशाच दिवसा नोकरी आणि रात्री आपल्या छोटासा व्यवसाय करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका हेल्थकेअर कंपनीमध्ये काम करणारी तरुणी ध्रुवी पांचाली. तिला स्वंयपाक करण्याची फार आवड होती. आपली हीच आवड जोपसण्यासाठी तिने स्वत:चा एक फूड स्टॉल सुरू केला. तिच्या फूड स्टॉलवर ती स्वादिष्ट मॅकरॉनी आणि पनीर किंवा इतर प्रकारचे पास्ता तयार करते. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिची प्रेरणादायी कथा ऐकून लोक तिचे कौतूक करत आहे.

इंस्टाग्राम यूजर योगेश जीवरानी याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर फूड स्टॉलवर ही तरुणी उभी आहे. तिच्या जवळ वेगवेगळे भांडे आहे, एक स्टोव्ह आहे, एका भांड्यात कापलेल्या भाज्या आणि पास्ता तयार करण्यासाठी आवश्यक सामान आहे.

हेही वाचा – हॉस्टेलमध्ये तरुणींनी केला जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहताच नेटकरीही झाले फॅन, म्हणाले, ‘रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा …’

हेही वाचा – भुकेल्या माकडांनी भातावर मारला ताव, तरुणीने हाताने भरवला घास; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, धुर्वीने बी. फार्माचे शिक्षण घेतले आहे आणि जॉयडस कंपनी ध्ये काम करते. पण तिला स्वयंपाकाची आवड आहे आणि ही आवड जोपसण्यासाठी तिने फूड स्टॉल सुरू केला आहे. तरुणीच्या जिद्दीचे सर्वजण कौतूक करत आहे कारण दिवसभर नोकरी केल्यानंतर ही तरुणी संध्याकाळी स्टॉल वर काम करते. जिथे तरुण-तरुणी जास्त संख्येने असतात अशा ठिकाणी तरुणीने तिचा फूड स्टॉल सुरू आहे. तरुणांना पास्ता आणि मॅकरोनी हे पदार्थ खायला आवडतात हे लक्षात घेऊन तिने हा फूड स्टॉल सूरू केला आहे.

तिने सांगितले की, शनिवारी ऑफिसमधून घरी गेल्यानंतर तरी तिच्या फूड स्टॉलसाठी तयारी सुरू करते. अहमदाबादमध्ये कॅप्टन खाऊ गल्लीमध्ये ६.३०वाजता फूड स्टॉल सुरू करते आणि तिथे अप्रतिम पास्ता आणि मॅकरॉनी विकते. स्वयंपाक करून आणि लोकांना खायला घालून तिला खूप समाधान मिळते असे ती सांगते.

हा व्हिडीओ १८ सप्टेंबरला पोस्ट केला होता आणि आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली की, ती चांगले काम करत आहे. आपण सर्वांनी तिने बनवलेला पास्ताचा आस्वाद घ्यायला हवा”‘
दुसऱ्याने सांगितले की, ”तिने बनवलेले पदार्थ स्वादिष्ट आहेत असे वाटते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pharma employee opens pasta stall in evening on weekends to follow her passion goes viral snk

First published on: 21-09-2023 at 18:25 IST
Next Story
मुकेश अंबानी, सद्गुरू यांच्या नावे होतोय घोटाळा; ‘अशी’ व्हायरल पोस्ट तुमच्यापर्यंत आली तर लगेच करा तक्रार