Philips Layoffs 2023: सध्या जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जात आहे. यात आता फिलिप्स कंपनीने सोमवारी जगभरातील ६००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स यांनी एका निवेदनात २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली आहे.
‘या’ कारणामुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या नुकसानीमुळे कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार दोषपूर्ण स्लीप रेस्पिरेटर्समुळे कंपनीने अलीकडेच आपली मोठ्या प्रमाणात उत्पादने परत मागवली आणि यामुळे संयुक्त राज्य अमेरिकामध्ये अनेक खटल्यांचा सामनाही करावा लागत आहे. यामुळे २०२२ च्या चौथ्या तिमाहीत फर्मचे १०५ दशलक्ष युरो नुकसान झाले. तर मागील वर्षात एकूण १.६०५ अब्ज युरोचा तोटा सहन करावा लागला.
( हे ही वाचा: Video: मुलीच्या हट्टापायी ‘ती’ ने गायले गाणे अन् थेट सोनू सूदकडून मिळाली ऑफर)
नोकऱ्यांमध्ये कपात अनेक टप्प्यात केली जाईल
फिलिप्सने कळवले आहे की ६००० नोकऱ्या एकाच वेळी काढल्या जाणार नाहीत. पहिल्या टप्प्यात २०२३ मध्ये एकूण ३००० नवीन नोकऱ्या कमी केल्या जातील. त्याच वेळी, २०२५ पर्यंत जगभरातील सुमारे ६००० कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील.