scorecardresearch

कडक माल था! पोलिसांची इंस्टाग्राम पोस्ट पाहून नेटकरी हैराण; खरं कारण होतं…

तुम्हाला अक्षय कुमार, परेश रावल यांच्या फिर हेरा फेरी मधील कचरा शेठ आठवतोय का?

कडक माल था! पोलिसांची इंस्टाग्राम पोस्ट पाहून नेटकरी हैराण; खरं कारण होतं…
आसाम पोलिसांची ड्रॅग माफियांना Warning (फोटो: Instagram)

तुम्हाला अक्षय कुमार, परेश रावल यांच्या फिर हेरा फेरी मधील कचरा शेठ आठवतोय का? त्याचा कडक माल है हा एक डायलॉग आजही अनेक मीम पेजची जान आहे असं म्हणता येईल. पण आता हा डायलॉग चक्क पोलिसांनी इंस्टाग्राम वरून पोस्ट केल्याने नेटकरी बरेच हैराण झाले आहेत. आसाम पोलिसांच्या इंस्टाग्राम हॅण्डल वरून कचरा शेठचा मीम पोस्ट करण्यात आला मात्र त्याआधी त्यात एक छोटा बदल सुद्धा केलेला होता. कडक माल है च्या ऐवजी काठ मारून कडक माल था अशी ही पोस्ट आहे. फोटो पाहून चक्रावलेल्या नेटकऱ्यांनी जेव्हा कॅप्शन वाचलं तेव्हा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आसाम पोलिसांनी शेअर केलेल्या फोटो मध्ये फिर हेरा फेरीच्या कचरा शेठचा फोटो लावून आजूबाजूला आग लागल्याचं डिझाईन आहे. जर आपण फोटो नीट पाहिला तर मागच्या बाजूला आपल्याला एका बोर्ड वर ड्रग्जची मोठ्या प्रमाणावर विल्हेवाट लावलेली आहे असे लिहिलेले दिसेल. या फोटो मध्ये सुद्धा गांजा व हेरॉईन जळताना दिसत आहे. तर पोलिसांनी कॅप्शन मध्ये, “समस्त कचरा शेठांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे, आम्ही राज्यभरात मादक पदार्थाच्या तस्करी विरुद्ध अभियान जारी केले आहे” अशी माहिती वजा वॉर्निंग दिली आहे.

कडक माल था व्हायरल पोस्ट

डेटींग अ‍ॅप वर तो रक्षाबंधनासाठी शोधतोय बहीण; Tinder वरील ‘तो’ अवालिया चर्चेत

दरम्यान ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे. अनेकांनी या हटके पोस्टचं कौतुक करून पोलिसांचा क्रिएटिव्ह टीमची सुद्धा वाहवा केली आहे. मुंबई पोलिसांच्या इंस्टाग्राम हॅण्डल वरून सुद्धा अनेक वेळा फिल्मी अंदाजात खूप भन्नाट पोस्ट केल्या जातात. अलीकडेच मॉडिफाइड सिग्नल वापरण्याची सूचना देताना 3 इडियट्स मधील चतुरचा फोटो वापरून केलेली पोस्ट सुद्धा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली होती, फोटो इतकेच कॅप्शन सुद्धा मजेशीर असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या