Desi Jugaad Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही; पण काही व्हिडीओ लगेच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. विशेषत: आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित असलेले व्हिडीओ पाहण्यात अनेकांना रस असतो. आता हाच व्हिडीओच पाहा ना, ज्यात एका दुकानदाराने ‘फोन पे’च्या पेमेंट मशीनचा असा काय वापर केला आहे की, जो पाहून कोणीही चक्रावून जाईल. दुकानदाराने गाणी ऐकण्यासाठी ‘फोन पे’च्या मशीनचा जुगाड पाहून युजर्स आता कपाळावर हात मारत आहेत; पण त्याने हा जुगाड कशा पद्धतीने केला ते पाहू …
स्पीकरवर गाणी ऐकण्याची हौस ‘फोन पे’ मशीनद्वारे केली पूर्ण
तुमच्यापैकी अनेक जण पेमेंट करण्यासाठी ‘फोन पे’चा वापर करीत असतील. अगदी लहान लहान वस्तू विकत घेण्यासाठीही लोक बहुतांशी डिजिटल पेमेंटचा आधार घेतात. विशेषत: लहान लहान दुकानांमध्ये ‘फोन पे’चा सर्वाधिक वापर होतो. या दुकानांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, एक स्कॅनर कोड चिकटवलेला एक छोटा स्पीकर असतो. तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्यातून आवाज येतो. “फोन पेवर १० रुपये प्राप्त हुऐ.” ग्राहकाने दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूची किंमत त्याच्या मोबाईलद्वारे स्कॅनर कोड स्कॅन करून पाठविल्यानंतर ते पैसे संबंधित अकाउंटवर जमा झालेत की नाही हे समजण्यासाठी या स्पीकरचा वापर दुकानदारांकडून केला जातो. पण, एका दुकानदाराने हा स्पीकर चक्क गाणी ऐकण्याच्या स्पीकरमध्ये परावर्तित केला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दुकानदाराने फोन पेच्या स्पीकरवरील स्कॅनर कोड काढून टाकला आहे, तसेच या स्पीकरच्या बाहेरच्या बाजूने रेडिओला जशी ऑन-ऑफ, व्हॉल्यूम कमी-जास्त करण्यासाठी जशी बटणे असतात, तशा बटणांचा सेट जोडला आहे. त्याच्या मदतीने तो त्याला पाहिजे ती गाणी ‘प्ले’ करून करतोय. अनेकांनी हा जुगाड पाहून भारतात टॅलेंटची काही कमी नाही, असे म्हटलेय. तसेच अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
हा मजेशीर व्हिडीओ @dulichand_nngal नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. एका युजरने लिहिले की, ‘फोन पे’वालाही विचारात पडेल. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘फोन पे’वाला आता एका कोपऱ्यात बसून रडत असेल. तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘फोन पे’वर सदाबहार गाणी प्राप्त झाली आहेत. चौथ्या युजरने लिहिले की, जुगाड करण्यालापण काहीतरी लिमिट असतो यार … अशा प्रकारे अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहिल्यावर हसून मजेशीर कमेंट्स करीत आहेत.