Photo of groom working on laptop amid wedding rituals went viral, people said he is doing work from home | Loksatta

अन् लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं केलं ऑफिसचं काम! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “वर्क फ्रॉम होम…”

चक्क लग्न मंडपात बसून नदरदेव करतोय वर्क फ्रॉम होम. पाहा फोटो.

अन् लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं केलं ऑफिसचं काम! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “वर्क फ्रॉम होम…”
(Photo- instagram i_g Calcutta) लग्न मंडपात बसून नदरदेव करतोय वर्क फ्रॉम होम.

सोशल मीडियात अनेक व्हिडीओज, फोटोज व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की ते पाहून हसू आवरत नाही. काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. तर काही व्हिडीओ हे प्रेम व्यक्त करणारे असतात. ज्यामध्ये नवरदेव-नववधू लग्नाच्या दिवशी एकमेकांबाबतचं प्रेम व्यक्त करतात. तर काही व्हिडीओ अवाक् करणारे असतात.

आता कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या त्यांच्या अनेक सवयी बदलाव्या लागल्या आहेत. अशातच बहुतांश लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. पण कोरोनाने खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या आयुष्यात ट्विस्ट आणलाय. वर्क फ्रॉम होम जेव्हापासून आलंय तेव्हापासून कोण कुठे बसून कधी काम करेल याचा काहीच नेम नाही. आता हा व्हायरल फोटोच बघा. हा नवरदेव लग्नाच्या दिवशी वर्क फ्रॉम होम करतांना दिसत आहे. हा फोटो बघून लोक प्रचंड हसले आहेत.

मंडपातच नवरदेव करतोय वर्क फ्रॉम होम

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून हे लग्न कोलकाता येथील असल्याचे कळते. एकीकडे पुजारी विधी करत आहेत तर दुसरीकडे नवरदेव लॅपटॉपवर व्यस्त आहे. श्रीमोयी दास नावाच्या युजरने आपल्या इन्स्टा स्टोरीवर हा फोटो पोस्ट केला आहे. येथून हा फोटो व्हायरल झाला. श्रीमोयीच्या कथेनुसार तिच्या भावाचे लग्न होत आहे.

(आणखी वाचा : Cursed Chair: आजवर जो ‘या’ खुर्चीवर बसला तो संपला; जाणून घ्या शापित खुर्चीची गोष्ट )

व्हायरल झालेल्या फोटोओत दिसत आहे की, नवरदेव त्याच्या लग्नाच्या दिवशी लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्रीमोयी नावाच्या युझरने लिहिले की, हा तिचा भाऊ आहे आणि हे त्याचे लग्न आहे. पण लग्नाच्या विधीदरम्यान सुद्धा तिचा भाऊ लॅपटॉपवर काम करत आहे. हा फोटो शेअर होताच तो व्हायरल होतो.

लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, भाऊ, आपण कोणत्या जगात राहत आहोत की लग्नाच्या दिवशीही सुट्टी नसते. त्याचबरोबर एका युझरने असेही म्हटले आहे की, तो थोडाफार काम करत असेल. सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 09:46 IST
Next Story
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र