डोकं नसणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे या Viral Photo मागील सत्यता | Photo of headless security guard goes viral on social media; Find out the truth behind this | Loksatta

डोकं नसणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे या Viral Photo मागील सत्यता

सध्या सोशल मीडियावर एका सुरक्षा रक्षकाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

डोकं नसणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे या Viral Photo मागील सत्यता
हे पाहून तुम्हीही गोंधळलात का? (Photo : reddit.com)

ऑप्टिकल इल्यूजन कोणालाही सहज गोंधळात टाकू शकतो. इंटरनेटवर तर असे फोटो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सध्या सोशल मीडियावर एका सुरक्षा रक्षकाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की या सुरक्षा रक्षकाचे डोकेच नाही आहे. चला तर मग जाणून घेऊया सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डोके नसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या या फोटोचे सत्य काय आहे.

रेडिटवर शेअर केलेल्या छायाचित्रात एक सुरक्षा रक्षक बंद दुकानासमोर खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तसे, ही एक सामान्य गोष्ट आहे कारण अनेकदा घर, दुकान किंवा कार्यालयाबाहेर ड्युटी करणारे सुरक्षा रक्षक बसलेले दिसतात. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोमध्ये त्या व्यक्तीचे डोके दिसत नाही.

Viral Video : …अन् बघता बघता समुद्रात वाहून गेले ३ कोटींचे घर; पाहा निसर्गाचे रौद्र रूप

हे पाहून तुम्हीही गोंधळलात का? परंतु हा फोटो पाहिल्यानंतर गोंधळून जाणारे तुम्ही एकटेच नाहीत. लोकांना या चित्रामागील रहस्य समजण्यास बराच वेळ लागला. नंतर असे दिसून आले की गार्ड डुलकी घेत होता आणि त्याच दरम्यान त्याचे डोके खूप मागे गेले होते. जे फोटोमध्ये दिसत नाही.

या पोस्टला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक अपव्होट्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. चित्राला भितीदायक म्हणण्यापासून ते चित्रामागील रहस्य शोधण्यापर्यंत लोकांनी कमेंटमध्ये बरेच काही सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-05-2022 at 17:37 IST
Next Story
Video: “मोदींच्या कार्यालयात महत्वाची बैठक सुरु असताना खिडकीत मोर आला आणि…”; अमित शाहांनी सांगितला ‘तो’ किस्सा