फोटोग्राफरने कॅमेरामध्ये कैद केला तीन डोक्याचा चित्ता; नेटकरी म्हणतात, हा फोटो म्हणजे परफेक्ट टायमिंगचा उत्तम नमुना

जेव्हा एखादा वाइल्ड लाइफ फोटोग्राफर या सुंदर जनावराला आपल्या कॅमेरामध्ये कैद करतो, तेव्हा त्याचे फोटो बघण्यासारखे असतात.

3 headed cheetah
आज संपूर्ण जगात फक्त आफ्रिकेत मोजकेच चित्ता शिल्लक आहेत. (Photo : Facebook / @paulgoldsteinphotography)

वेग ही चित्त्याची ओळख आहे. असं म्हटलं जातं, चित्ता जेव्हा धावतो तेव्हा तो अर्धा वेळ हवेत असतो. हा प्राणी १०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतो. म्हणून याच्या तावडीतून सुटणे अशक्य आहे. तथापि, चित्ता हा प्राणी धोक्यात आहे. आज संपूर्ण जगात फक्त आफ्रिकेत मोजकेच चित्ता शिल्लक आहेत. भारतासह आशियातील प्रत्येक देशातून हा प्राणी कमी-अधिक प्रमाणात नामशेष झाला आहे. अशावेळी जेव्हा एखादा वाइल्ड लाइफ फोटोग्राफर या सुंदर जनावराला आपल्या कॅमेरामध्ये कैद करतो, तेव्हा त्याचे फोटो बघण्यासारखे असतात. अशाच एका फोटोग्राफरने काढलेला चित्त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा सुंदर फोटो विम्बल्डनचे वाइल्डलाइफ फोटोग्राफर पॉल गोल्डस्टीन यांनी केनियाच्या मसाई मारा राष्ट्रीय उद्यानात काढला आहे. त्यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर केला असून यासोबत एक छानसे कॅप्शन लिहले आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, “पावसामध्ये घालवलेले हे सात तास नक्कीच फायद्याचे ठरले. यासारखे क्षण मंत्रमुग्ध करणारे असतात.” पॉलची ही पोस्ट अनेकांना आवडली असून त्यांच्या या पोस्टवर खूप प्रतिक्रिया आल्या आहेत.

चित्ता हा प्राणी वाघ आणि सिंहाच्या परिवारातील असला तरीही तो त्यांच्यासारखा डरकाळी फोडू शकत नाही. ते मांजरांसारखे गुरगुरतात आणि ओरडतात. अनेक चित्ता भुंकतानाही दिसले आहेत. त्यांना रात्रीच्या वेळी क्वचितच दिसते. त्यामुळे ते दिवसा शिकार करतात. तसेच, चित्त्यांना झाडांवरही चढताना त्रास होतो. मादी चित्ता एकटी किंवा तिची पिल्लं मोठी होईपर्यंत त्यांच्यासोबत राहते, तर नर चित्ता लहान गटात राहतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Photographer captures three headed cheetah in camera pvp

Next Story
राणू मंडलने गायलं ‘Kacha Badam’ गाणं, VIRAL VIDEO पाहिल्यानंतर लोक म्हणाले, ‘सगळा मूड खराब केला’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी