scorecardresearch

समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमधून फोटोग्राफरने कैद केला ‘जलदेवी’चा चेहरा, Viral फोटो पाहून व्हाल थक्क

फोटोग्राफरने तब्बल १२ तास फोटोग्राफी करत सुमारे ४ हजार फोटो काढले आहेत

social media viral news
अनेक शब्दांचे काम एक फोटो करतो असं म्हटलं जातं. (Photo : Instagram)

अनेक शब्दांचे काम एक फोटो करतो असं म्हटलं जातं. सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात अनेकजण स्वत:ला फोटोग्राफर म्हणवून घेतात. मात्र काही मोजेकच लोक असे असतात ज्यांना फोटोग्राफी खऱ्या अर्थाने समजलेले असते. अशा लोकांनी काढलेल्या फोटोंची दखल जगभरात घेतली जाते. सध्या अशीच एक व्यक्ती आपल्या अनोख्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. त्याचं नाव आहे इयान स्प्रॉट या फोटोग्राफरने समुद्रकिनाऱ्यावर असे काही फोटो काढले आहेत की त्याची चर्चा जगभरात सुरु आहे.

४१ वर्षीय फोटोग्राफरने नुकतेच आप्लया इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ते फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हो कारण लाइटहाउसजवळ काढलेल्या त्याच्या फोटोंमध्ये, चेहऱ्याच्या आकाराच्या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. जे पाहून अनेकजण थक्क झाले असून लोक या फोटोग्राफरचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

हेही पाहा- Video: तरुणाचा लग्नातील तो डान्स अखेरचा ठरला; लोक शिट्टी वाजवत राहिले आणि तो मृत्यूशी झुंजत…

हेही पाहा- Video: “शेती चांगली की नोकरी…” शेतात राबणाऱ्या आईला भेटण्यासाठी DSP मुलगा थेट बांधावर पोहचतो अन्…

फोटोग्राफर हे फोटो Ian Sproat याने २७ फेब्रुवारी रोजी त्याच्या @mje_photography_ne नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. त्याने हे फोटो पोस्ट करताना, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लाटांमधील चेहरा पाण्याची देवी अॅम्फिट्राईट आहे की, आमची प्रिय राणी एलिझाबेथ आहे?’ आतापर्यंत या पोस्टला आतापर्यंत या पोस्टला अनेकांनी लाईक केलं आहे. तर लोक त्याखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी अप्रतिम अशी कमेंट केली, तर काहींनी हे अकल्पनीय असल्याचं म्हटलं आहे.

इयान स्प्रॉट नॉर्थ टायनेसाइड, यूके येथील एक उत्तम फोटोग्राफर आहेत. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, त्यांनी शनिवारी सुंदरलँडमधील रोकर पायर (Roker Pier) येथे १२ तास फोटोग्राफी करत सुमारे ४ हजार फोटो काढले. जेव्हा ते काढलेले फोटो पाहत होते तेव्हा लाटांनी बनलेला चेहरा पाहून त्यांना धक्काच बसला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 17:00 IST
ताज्या बातम्या