सोशल मीडियावर अनेक नवनव्या गोष्टी लक्ष वेधून घेत असतात. मग तो डान्स असो की, आणखी काही. यामुळे कधी हसायला तर, कधी नेटकऱ्यांच्या डोक्याचा पारा चढतो. आता सोशल मीडियावर एका बेडशीटचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही बोलाल या बेडशीट आणि उशीच्या कव्हरमध्ये नक्की काय आहे?, की आश्चर्य वाटेल. पण आता सोशल मीडियावर बेडशीट आणि उशीचे कव्हर चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर उशीच्या कव्हरसह नान बेडशीटचे फोटो व्हायरल होत आहेत. नान रोटीसारखी प्रिंट असलेली बेडशीट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. भारतीय अमेरिकन मॉडेल आणि लेखिका पद्मा लक्ष्मी हीने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ‘दोन उशांसह नान बेडशीट विक्रीसाठी’, असा मजकूर लिहीला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहून नेटकरीही चक्रावले आहेत. नेटकरी हा फोटो शेअर करण्याबरोबरच त्यावर कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी लिहीलं आहे की, या बेडवर झोप लागणार नाही, तर कायम भूक लागल्यासारखं होईल. तर एका युजर्सने लिहीलं आहे की, ‘बेड आणि ब्रेकफास्ट’, दुसऱ्याने लिहीलं आहे की, ‘अचानक मला भूक लागू लागली आहे.’ तर अनेकांनी मॉडेलला विविध प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे.

Viral: विमानात मांजरीला स्तनपान करू लागली महिला! कृती पाहून पॅसेंजर झाले हैराण

पद्मा लक्ष्मी एक उत्तम मॉडेल आहे. पद्माने वयाच्या १८ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. तिचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता आणि तिची आई न्यूयॉर्कमध्ये राहत होती, त्यामुळे ती अनेकदा अमेरिकेत येत असे आणि नंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. पद्माने 2003 मध्ये ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कतरिना कैफचाही हा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.