Shocking video: राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयत. दररोज नवनव्या गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. विरोधकही सरकारला धारेवर धरत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये पुणे हादरून गेले आहे. पुण्यात एका तरुणाने आईने नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून असे काही केले की, पाहून तुम्हीही हादराल. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण मध्यरात्री पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीला आग लावत आहे. आग लावताक्षणीच दुचाकी पेट घेते आणि सर्वत्र आगीचा भडका उडतो. आपले काम पूर्ण केल्यांनतर तो तेथून पळून जातो. माहितीनुसार, ही घटना पिंपरीतील एका सोसायटीमध्ये घडल्याचे समजत आहे. आरोपीदेखील याच सोसायटीमध्ये राहत होता. तर या आरोपीचे नाव स्वप्निल शिवशरण पवार असे असून तो २७ वर्षांचा आहे. आईने ड्रग्जसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने तो राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांच्या डझनभर दुचाकी जाळून टाकल्या. दरम्यान ही घटना बुधवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.

स्वप्निलच्या आईने सांगितल्याप्रमाणे, तो पहाटे ३ च्या सुमारास घरी पोहचला आणि त्याने आईकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. जेव्हा आईने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने संपूर्ण इमारतीला आग लावण्याची धमकी दिली. सध्या स्वप्नीलला पोलिसांच्या हवाली केले आहे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @punepulse नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, अशांना जागीच ठेचलं पाहिजे, तर आणखी एकानं, अशा तरुणांना आता सोडलं ते पुढे यापेक्षा क्रूर कृत्य करु शकतात.

Story img Loader