scorecardresearch

Viral Video : ३०० प्रवाशांनी भरलेल्या विमानाला अचानक लागली आग अन् घडलं…

३०० प्रवशांनी भरलेलं विमान रनवेवरून उड्डाण घेत असताना नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओ.

Fire In Flight Viral Video
विमानाला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल. (Image- Igor Zhorov/Instagram)

Fire On Plane Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासातील घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण एका विमानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनं अनेकांचा थरकाप उडवला आहे. फुकेत ते मॉस्को प्रवासासाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना रशियन अझूर विमानात अचानक इंजिनमध्ये बिघाड झाला. फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाला आग लागली. ही दुर्देवी घटना ४ फेब्रुवारीला घडली असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या विमानातून जवळपास ३०० प्रवासी मॉस्कोला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, विमानाला आग लागल्याचे कळताच फुकेत विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीनं दखल घेतली आणि विमानाचे उड्डाण रद्द केले.

रशियन एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग 767-300 ER या विमानातून जवळपास ३०० प्रवासी आणि १२ अधिकारी प्रवास करत होते. विमानाला आग लागल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत प्रवाशांना झाली नाही. विमानाच्या उजव्या बाजूच्या विंगला आग लागल्याचं जेट ड्रायव्हिंग व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं. विमानातील तांत्रिक बिघाड झाल्याने तज्ज्ञांकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालीय. २६ वर्षांपूर्वी हे विमान तयार करण्यात आलं होतं. २०१५ पासून अझूर एअरसाठी हे विमान प्रवाशांसाठी कार्यरत आहे.

नक्की वाचा – Viral Video: साडी नेसून महिलेनं नदीत मारली कोलांटी उडी…स्विमिंगचा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान दुर्घटना झाल्यानंतर रनवे ४० मिनिटांसाठी बंद करण्यात आला होता. जवळपास ४७ विमानांचा प्रवास पुढे ढकलण्यात आला. तर काही विमानं क्राबी,समुई आणि बॅंकॉकला पुन्हा त्याच मार्गाने पाठवण्यात आली. विमानाला आग लागल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या विमानाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ ट्वीटवर शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:19 IST