पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वागणुकीमधील छोट्या छोट्या गोष्टींसाठी ओळखले जातात. कधी राजपथावर अचानक मुलांची भेट घेणं, तर कधी वाराणीसमधील एखाद्या चहाच्या दुकानामध्ये जाऊन चहाच्या आस्वाद घेणं यासारख्या गोष्टी पंतप्रधानांनी केल्यानंतर त्याचीही देशभरामध्ये चर्चा होते. पंतप्रधान मोदींना पक्षांबद्दलही फार प्रेम आहे. मध्यंतरी त्यांनी पंतप्रधान निवासामध्ये मोराला दाणे टाकतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. मात्र मोदींच्या संवेदनशीलपणाचं उदाहरण देताना त्यांचे सहकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक किस्सा नुकताच एका कार्यक्रमात सांगितला.

नक्की पाहा >> Video: अंधत्व आलेल्या व्यक्तीच्या मुलीचे ते शब्द ऐकून मोदी गहिवरले; काय बोलावं पंतप्रधानांना सुचलं नाही अन्…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द मोदी स्टोरी नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अमित शाह यांनी हा किस्सा सांगितल्याचं पहायला मिळत आहे. संवेदनशीलता आणि छोट्यात छोट्या स्तरावरील व्यक्तीचा विचार करणं हे पंतप्रधान मोदींची गुणवैशिष्ट्ये असल्याचं मत अमित शाह यांनी भाषणात बोलताना व्यक्त केलंय.

“देशाचे पंतप्रधान या नात्याने तुम्हाला एक उदाहरण देतो, एका गंभीर विषयावर आमची बैठक सुरु होती. त्यावेळी मी भाजपाचा अध्यक्ष होतो. मोदींच्या ऑफिसमध्येच बैठक सुरु होती. त्यावेळेच अचानक तिथे खिडकीत एक मोर आला आणि त्याने जोरात आपली चोच खिडकीच्या काचेवर मारण्यास सुरुवात केली. दोन-तीन मिनिटं हे सुरु होतं,” असं अमित शाह भाषणादरम्यान किस्सा सांगताना म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अमित शाहांच्या घरातील भिंतीवर असणाऱ्या ‘त्या’ दोन फोटोंमागील गुपित माहितीय का?

पुढे बोलताना, “त्यानंतर मोदींनी बेल वाजवून कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं की आज याला दाणे टाकण्यात आलेली नाहीत. जरा त्याला काहीतरी खायला द्या, तो उपाशी आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यात एवढ्या मोठ्या स्तरावरील बैठकीमध्ये या मोराच्या भूकेबद्दलचा विचार येणं यावरुन ते किती संवेदनशील व्यक्ती आहेत हे दिसतं,” असं अमित शाह म्हणाले आहेत.  नवी दिल्लीत बुधवारी Modi@20: Dreams Meeting Delivery या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा >> कितीही व्यस्त असले तरी रोज रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास अमित शाह ‘या’ व्यक्तीला करतात फोन; फोनशिवाय एकही दिवस जात नाही

“एखाद्या उपाशी पक्षासाठी पंतप्रधानांनी महत्वाची बैठक थांबवण्याचं कधी ऐकलंय का? केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींबद्दलची अशीच एक गोष्ट सांगितलीय. ज्यामधून त्यांना सर्वांबद्दलच वाटणारी काळजी झळकते,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

नक्की पाहा हे फोटो >> “शिवाजी महाराजांचा विषय निघाला की अमित शाह…”; इंग्लंडवरुन ऐतिहासिक पुरावे आणून मराठ्यांचा इतिहास…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi interrupted an important meeting to cater to the needs of a hungry bird amit shah recalls scsg
First published on: 13-05-2022 at 17:01 IST