scorecardresearch

“पंतप्रधान मोदीजी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड होतील”; अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

एक वाद शांत होत असतानाच आता त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक भविष्यवाणी केलीय आणि त्यामुळेच तो पुन्हा चर्चेत आल्याचं चित्र दिसत आहे

“पंतप्रधान मोदीजी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड होतील”; अभिनेत्याचं ट्विट चर्चेत
यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. (फाइल फोटो, सौजन्य : पीटीआय)

अभिनेता आणि स्वघोषित समीक्षक कमाल रशिद खान म्हणजेच केआरके कायमच सोशल नेटवर्किंगवरील त्याच्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी केआरके अभिनेता सलमान खान आणि गायक मिक्का सिंगसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आलेला. हा वाद शांत होत असतानाच आता केआरकेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक भविष्यवाणी केलीय आणि त्यामुळेच केआरके पुन्हा चर्चेत आलाय.

केआरकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात ट्विट केलं आहे. “माझ्या आजच्या अंदाजानुसार, पंतप्रधान मोदीजी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड बाद होणार,” असं केआरकेने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केआरकेचं हे ट्विट व्हायरल झालं असून अनेकांनी त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्यात. पाहुयात नेटकऱ्यांचं नक्की म्हणणं तरी काय आहे.

१) हे पडलं ना…

२) ४०० हून अधिक लिहून घ्या…

३) मागच्या वेळेस भारत सोडला होता…

४) पहिल्यांदा काहीतरी चांगलं बोलला

५) तो नो बॉल असणार

६) खरं आहे…

७) विरोधक राहतील का?

८) एवढी कशाला घेतलीस…

९) वाह काय बोललाय…

१०) बॉलर कोण असेल ते सांग…

केआरकेच्या अनेक वक्तव्यांवरुन तो वादात सापडतो किंवा त्यावरुन चर्चा रंगताना दिसतात. या ट्विटमुळेही नेटकऱ्यांना चर्चेला आणखीन एक विषय मिळालाय असेच हे रिप्लाय पाहिल्यावर दिसून येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या