मोदींनी बदलला स्वत:चा डीपी; आता स्वत:च्या फोटोऐवजी ठेवलाय ‘हा’ फोटो

फोनवर ऐकली जाणारी करोनासंदर्भातील कॉलर ट्यून आता बदलली आहे.

Pm narendra modi changed twitter facebook account profile photo country 100 crore vaccinations
(Express photo: Ritesh Shukla)

देशाने १०० कोटी करोना लसींच्या डोसचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा फोटो बदलला आहे. पंतप्रधानांनी आपल्या फोटोद्वारे देशवासियांचे १०० कोटी लसी घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग ‘तिरंगा’ देखील फोटोमध्ये आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी देशाने करोना लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा पार करून विक्रम केला आहे. या ऐतिहासिक विक्रमासाठी देशातील सर्व नेत्यांनी देशाचे अभिनंदन केले आहे.

देशात १०० कोटी लसीकरणाच्या आनंदात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल फोटो बदलला आहे. पंतप्रधानांनी एका नवीन फोटोद्वारे भारताचे अभिनंदन केले आहे, ज्यात कोविड -१९ च्या विरोधात १०० कोटी डोस लिहिले गेले आहेत. एवढेच नाही तर फोनवर ऐकली जाणारी करोनासंदर्भातील कॉलर ट्यून आता बदलली आहे.

लसीकरणाच्या विक्रमानंतर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले होणारी कॉलर ट्यून देखील बदलली आहे. आता जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला लसीकरण मोहिमेचा यशस्वी संदेश ऐकायला मिळेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हापासून देशात करोना महामारीने आली, तेव्हापासून मोबाइल फोन वापरकर्त्यांना करोना महामारीबाबत सतर्क करण्यासाठी कॉलर ट्यून ऐकायला जात होती. मात्र, बऱ्याच वेळा लोकांना याचा कंटाळा आला आहे आणि तक्रारही केली आहे. काही लोकांनी कॉलर ट्यून काढण्यासाठी कोर्टात धावही घेतली होती.

याआधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० कोटी लसीकरणासाठी देशाचे अभिनंदन केले होते. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “भारताने इतिहास घडवला. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. लसीकरणात १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार,” असे पंतप्रधांनांनी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi changed twitter facebook account profile photo country 100 crore vaccinations abn

ताज्या बातम्या