Rishi Sunak Awkard Hug and Kiss Moment Viral:  इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दोन दिवसीय G7 शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान डॉ. ऋषी सुनक देखील सहभागी झाले होत. कार्यक्रमस्थळी पोहोचताच पंतप्रधान मेलोनी यांनी त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्यांची स्वागत करण्याची ही पद्धत आता चर्चेचा विषय बनली आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, ब्रिटनचे पंतप्रधान डॉ. ऋषी सुनक कार्यक्रमस्थळी पोहोचतात. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी त्यांच्या स्वागतासाठी तिथे हजर असतात. सुनक पोहोचताच मेलोनी त्यांना मिठी मारतात आणि गालावर चुंबन देत स्वागत करतात. यानंतर दोघेही एकमेकांचा हात पकडून काही वेळ मनमोकळं हसत बोलत असतात. काही वेळ गप्पा मारल्यानंतर दोघेही कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोज देऊ लागतात.

Sonia Gandhi With cigarette Viral Photo
सोनिया गांधी यांच्या हातात सिगारेट पाहून नेटकऱ्यांनी तुफान शेअर केला तो फोटो! पण ‘या’ लहानश्या गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं
Scientists Design a Spacesuit that Can Turn Urine into Drinking Water: How Does It Work?
मूत्रावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी तयार करणारा स्पेससूट; का आणि कशासाठी? संशोधन काय सांगते?
Cryonics death body freezing
Frozen Future मृत्यूनंतर शरीर गोठवण्याचा ट्रेण्ड अब्जाधीशांमध्ये का रूढ होतोय? खरंच माणूस परत जिवंत होणार?
Flight_Passenger_Video
विमानात तरुणाने एक एक करून स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले अन् सीटवर.. ; Video Viral होताच लोक का करतायत कौतुक?
Plot to sell plot in Makhmalabad area foiled due to vigilance of Deputy Registrar Sharad Davange nashik
भाषेतील फरक टिपला अन् भूखंड परस्पर विक्रीचा डाव फसला; सहदुय्यम निबंधकांची दक्षता
woman crushed her lover with a stone
पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले; व्हिडीओ व्हायरल
Poonam Pandey death hoax What does sadfishing mean performing sadness online meaning
पूनम पांडे, दु:खाचे भांडवल आणि लक्ष वेधण्याचा प्रकार; ‘सॅड फिशिंग’बाबतचे नवे संशोधन काय सांगते?
vladimir puting and kim jong
पेहले तुम! कारमध्ये बसण्यावरून रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची एकमेकांना विनंती, सर्वांत आधी कोण गेलं गाडीत?

अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याच्या या स्टाईलवरून आता युजर्स सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत. अनेकांनी पंतप्रधान मोदींशी संबंध जोडून मीम्स बनवण्यास सुरुवात केली आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनी ऋषी सुनक यांचे असे केले स्वागत

कारण मेलोनी यांनी भारतीय पद्धतीने म्हणजे नमस्ते म्हणत अनेक नेत्यांचे स्वागत केले. त्यांची ही पद्धत आता अनेकांना आवडली आहे. दरम्यान, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. भारत अकराव्यांदा G7 परिषदेत सहभागी होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत.

G7 देशांमध्ये भारतासह यूके, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे प्रमुख या समिटमध्ये उपस्थित आहेत. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचा समावेश आहे.

ऋषी सुनक यांच्या स्वागतानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस