Viral video: ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणाने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एक ट्रॅफिक पोलीस चक्क तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड चिडले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाहतूक पोलिस हवालदार रत्याच्या मधोमध तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण हात जोडून विनंती करताना दिसत आहे. ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस अधिकारी उड्डाणपुलाखाली उभे राहून वाहतूक नियंत्रित करत होते. हेल्मेट नसलेल्यामुळे तरुणाला पोलिसांनी थांबवले आणि त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. हा व्हिडीओ संभाजीनगरमधला असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई ट्रॅफिक पोलिसांचं स्पष्टीकरण

व्हिडिओवर अनेक युजर्संनी कंमेट करत पोलिसांचा निषेध केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहलं आहे की, “हा व्हिडिओ जूना असून मुंबईतला नाहीये आणि या घटनेवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! ट्रेकींगला गेलेल्या तरुणांच्या बाईक जळून खाक; प्रसिद्ध एकोले वॅली येथील थरारक VIDEO व्हायरल

व्हिडीओ व्हायरल होताच राज्यभरातले नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत पोलिसांवर टीका करत आहेत. काहींनी तर ट्रॅफिक पोलीस कशा पद्धतीनं दादागीरी दाखवतात याबद्दल अनुभव शेअर केले आहेत.