VIRAL : गर्लफ्रेंडला किस करण्याच्या नादात पोलिसाने गमावली नोकरी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

तुम्ही विचार करत असाल, एक पोलीस आपल्या गर्लफ्रेंडला किस करू शकत नाही का…? पण पत्नी असताना गर्लफ्रेंड आणि तिला किस करणं एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. नक्की काय आहे प्रकरण..वाचा सविस्तर…

police-constable-kissed-girlfriend

सरकारी नोकरीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. लाखोंच्या संख्येने प्रतिस्पर्धी असल्यामुळे सरकारी नोकर होणं म्हणजे आजच्या काळात मोठं दिव्य आहे. मात्र, सरकारी नोकरीमध्ये असून देखील एका छोट्याशा चुकांमुळे नोकरी गमवावी लागली तर ? तुम्ही विचार करत असाल, एक पोलीस आपल्या गर्लफ्रेंडला किस करू शकत नाही का…? पण पत्नी असताना गर्लफ्रेंड आणि तिला किस करणं एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. गर्लफ्रेंडला किस करण्याच्या नादात या पोलिस कर्मचाऱ्याने हातची नोकरी गमावलीय. गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आलंय. पोलीसाच्या या कारनाम्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय.

नेमका प्रकार काय ?

झालं असं की, तमिळनाडूमधल्या कोइंबतूर शहरातील सी.आर.पी.एफ दलात ग्रेड-१ चा पोलिस हवालदार त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका पार्कमध्ये बसला होता. वी. बालाजी असं या पोलिस हवादाराचं नाव असून तो २९ वर्षाचा आहे. मूळचा कुड्डालोरचा असून तो २०१७ मध्ये सीआरपीएफ सेवेत रुजू झाला होता. हा पोलिस हवालदार शुक्रवारी सायंकाळच्या वेळी गर्लफ्रेंडसोबत वलंकुलम बांध पार्कमध्ये गेला होता. पार्कमध्ये दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत असताना हा पोलिस हवालदार तिला किस करत होता. त्यावेळी तिथल्या काही तरूणांची नजर त्यांच्यावर गेली आणि मग त्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर या तरूणांनी हा व्हिडीओ कोइंबतूर पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून याबाबत तक्रार केली. त्यानंतर हा पोलिस कर्मचाऱ्याच्या या काळ्या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र या पोलिस कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा आली. हा पोलिस कर्मचारी ज्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडचा किस करत होता त्यावेळी तो पोलिस वर्दीत होता. पोलिसांची वर्दी ही त्यांची खरी ओळख आहे. खाकी वर्दीत गर्लफ्रेंडला किस करणं म्हणजे हा खाकी वर्दीचा अपमान आहे. यामुळे पोलिसांनी प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून निलंबीत करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जुळ्या बहिणींनी रिक्रिएट केलं ‘Squid Game’ मधलं पिंक सोल्जर गाणं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीने दुसऱ्या धर्मातील महिलेशी लग्न केलं होतं आणि तो कोइंबतूर पोलिस क्वार्टरमध्ये राहत होता. त्याने आपल्या पत्नीच्या ओळखीने दुसऱ्या आणखी एका मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला पार्कमध्ये सोबत घेऊन गेला आणि हे कारनामे केले.

हा किस्सा सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. पोलिसांचं हे किस प्रकरण इतकं चर्चेत आलं की, त्याला वरिष्ठ पोलिसांकडून नोटिस देण्यात आलीय. त्यामुळे आता त्या पोलिसाला घाम फुटण्याची वेळ आलीय. सोशल मीडियावर नेटिझन्स आपली वेगवेगली मतं शेअर करताना दिसून येत आहेत. व्हिडीओ खासगी असला तरी, एका पोलिसानेच पोलिसाच्या वर्दीचा अपमान केल्याची टीका होत आहे. अशा प्रकारांमुळे पोलिसांच्या प्रतीमेला डाग पोहोचत असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police constable kissed girlfriend in public park suspend after video viral prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या