आपल्या विभागातील चांगले काम करणा-या पोलीस अधिकां-याचे कौतुक करण्यात मुंबई पोलीस कधीच मागे नसतात. अधिका-यांने किंवा एखाद्या शाखेने चांगले काम केले की मुंबई पोलीस आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून त्या कामाची किंवा आपल्या अधिका-यांच्या योगदानाची माहिती जाहिर करते. त्यांचे कौतुकही करते. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी कॉन्स्टेबल सुहास नेवासे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सुहास यांनी आत्महत्या करु पाहणा-या ३३ वर्षीय व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
Video : ३०० लोकांना आत्महत्येपासून वाचवणारा ‘देवदूत’
साकिनाका पोलिस स्टेशनमध्ये संघर्ष नगर हिल परिसरात एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याचा फोन आला. अंधेरी भागात असलेल्या या परिसात आर्थिक कारणामुळे ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना ही बातमी कळताच सब इन्पेक्टर म्हात्रे आणि कॉन्सेटबल सुहास नेवासे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशा वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता नेवासे हे टेकडीवर चढले आणि आत्महत्या करणा-या व्यक्तीला असे करण्यापासून परावृत्त केले. जवळपास अर्धा तास त्यांनी या नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तीशी संवाद साधला आणि त्याला सुरक्षित खाली घेऊन आले. असे करताना त्यांना तोल जाऊन ते ५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. पण तरीही सुहास यांनी आपले प्राण धोक्यात घालून या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखले. पगार मिळाला नसल्याने तो आत्महत्या करू पाहत होता. सुहास यांनी त्याला पगार मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिल्यानंतर तो खाली यायला तयार झाला. म्हणूनच कॉन्टेबल सुहास यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Very proud 2 share d story of Police Constable Suhas Nevase, who negotiated with a suicidal 33 years old & saved him pic.twitter.com/x7cmHbcJtp
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 2, 2016