Police Helping Women Treveller In Crowded Train Viral Video: भारतीय रेल्वेतील गर्दी आणि धडपडीचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. अनेकदा असे काही व्हिडीओ समोर येतात ज्यामुळे मन अगदी अस्वस्थ होऊन जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने माणुसकीवरील तुमचा विश्वास आणखी घट्ट होईल. हा व्हिडीओ आहे एका पोलीस अधिकाऱ्याचा ज्याने कर्तव्यापलिकडे जाऊन एका असहाय्य कुटुंबाला मदत केली.

व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनचा गर्दीने भरलेला जनरल डबा दिसतो. ट्रेनच्या दाराजवळ जिथून लोक सतत ये-जा करतात, तिथे दोन महिला त्यांचया लहान मुलांसह जमिनीवर बसल्या होत्या. गर्दी इतकी जास्त होती की त्यांना साधे पायही पुढे करता येत नव्हते. शिवाय, व्यवस्थित बसायला जागाही नव्हती.

तितक्यात एका ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे त्या असहाय्य कुटुंबाकडे लक्ष गेले. क्षणाचाही विलंब न करता पोलीस अधिकाऱ्याने त्यांना बसण्यासाठी जागा करून दिली. इतर लोकांना समजावत आणि विनंती करून या पोलीस अधिकाऱ्याने त्या महिला आणि मुलांसाठी सीटवर किमान नीट बसता येईल अशी सोय करून दिली.

पोलीस अधिकाऱ्याने मानवता आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींमध्ये त्याचे जनतेच्या रक्षणाप्रती असलेले कर्तव्य निभावले. गेटजवळ बसणे प्राणघातक ठरू शकते. शिवाय लहान मुलांसाठीही ते योग्य नाही. म्हणून या अधिकाऱ्याने डब्याच्या सुरक्षित ठिकाणी त्यांना बसण्याची सोय करून दिली. हा ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

व्हिडीओवर कमेंट करत एक युजरने लिहिले की, “ही खरी सेवा आहे. पोलिसांची वर्दी ही केवळ भीती निर्माण करण्यासाठी नाही तर निराधार लोकांना आधार देण्यासाठी देखील आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “या अधिकाऱ्याने सिद्ध केले की वर्दीतल्या माणसालाही मन असतं. आपल्याला असेच अधिकारी हवेत.” तसंच आणखी एकाने कमेट केली की, “वर्दी ही केवळ कायदाच पाळत नाही तर कधीकधी तो मानवता देखील शिकवतो. आम्हाला आमच्या पोलिसांचा अभिमान आहे.”

लोक सकारात्मकतेचं प्रतीक म्हणून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. बऱ्याचदा आपण गर्दीचा लोकांना होणारा त्रास दुर्लक्षित करतो, मात्र या अधिकाऱ्या छोट्याशा कृतीने केवळ एका कुटुंबाचा प्रवास सोपा केला नाही तर समाजाला सहानुभूतीचा धडाही शिकवला. हा व्हिडीओ पाहून खरी सेवा म्हणजे केवळ आदेशांचे पालन करणे नव्हे तर आपुलकी आणि संयमाने वागणे देखील आहे.