scorecardresearch

जोरजोरात हॉर्न वाजवणाऱ्या पोलिसांनी तरुणांना असा शिकवला धडा, पाहा VIRAL VIDEO

सिग्नलवर बऱ्याचदा हॉर्न वाजवण्याची सवय असते. रस्त्यावर ये जा करत अनेक रोडरोमियो विनाकारण हॉर्न वाजवला की बाजुने जाणाऱ्या लोकांची तळपायाची आग मस्तकात जाते. अशा लोकांना बऱ्याचदा आपण ओरडतो किंवा इग्नोर करतो. अशाच दोन तरूणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

over-honking
(Photo: Instagram/ meemlogy )

सिग्नलवर बऱ्याचदा हॉर्न वाजवण्याची सवय असते. रस्त्यावर ये जा करत अनेक रोडरोमियो विनाकारण हॉर्न वाजवला की बाजुने जाणाऱ्या लोकांची तळपायाची आग मस्तकात जाते. अशा लोकांना बऱ्याचदा आपण ओरडतो किंवा इग्नोर करतो. बऱ्याचदा सांगूनही असे लोक हॉर्न वाजवतात. असंच हॉर्न वाजवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन मुलांना मोठ्या आवाजात हॉर्न वाजवताना पोलिसांनी पकडलं आहे. यादरम्यान त्यांना अशी शिक्षा झाली की, ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. दोन मुलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही तरूणांना जबरदस्त शिक्षा दिली आहे. ही शिक्षा दोघे तरूण आयुष्यात कधीच विसरणार नाहीत. रस्त्यात ज्या पद्धतीने ते लोकांच्या कानात हॉर्न वाजवत होते अगदी तसंच एकमेकांच्या कानात हॉर्न वाजवण्याची शिक्षा दिली. यादरम्यान हॉर्नच्या आवाजाने दोन्ही मुलांची अत्यंत वाईट अस्वस्था झाली. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच चाहत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा : धुळीच्या वावटळात अडकून पॅराग्लायडर थेट कुंपणालाच आदळला आणि झाडाला लटकला, VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरदेवाने नवरीऐवजी चक्क सासूच्याच गळ्यात टाकली वरमाला, वऱ्हाडी मंडळी बघतच राहिले

अशी शिक्षा पोलिसांनी दिली
पोलीस कर्मचाऱ्याने ज्या प्रकारे खोडकर मुलांना शिक्षा केली, त्याचे नेटिझन्स कौतुक करत आहेत. meemlogyandghanta नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police wale ka video google trends policeman cleverly caught boys who did over honking see what happened next went viral prp

ताज्या बातम्या