scorecardresearch

Video: माउंटेन सिंहाने ‘भुताचा’ आवाज काढताच पोलीसाला फुटला घाम; थेट पळत सुटला अन..

हा व्हिडिओ सोशल मिडियावर १ मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला आहे…

Video: माउंटेन सिंहाने ‘भुताचा’ आवाज काढताच पोलीसाला फुटला घाम; थेट पळत सुटला अन..
photo: social media

सिंहाला पाहून किंवा त्याची फक्त डरकाळी ऐकून अनेकांना घाम फुटतो. मग तो पोलीस असला तरी त्याला सिंहाची भीती ही वाटतेच. मोठमोठे प्राणी देखील सिंहाच्या जवळ जायला घाबरतात. सध्या सोशल मीडियावर माउंटेन सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात सिंहाची डरकाळी ऐकताच पोलीस घाबरला आणि तिथून पळत सुटला. या व्हिडिओमध्ये सिंहाने दिलेली डरकाळी नव्हे तर सिंहाने काढलेला भुताचा आवाज ऐकायला येत आहे. कदाचित तोच आवाज ऐकून पोलीस सुद्धा घाबरला असेल. तुम्हीही एकदा हा व्हिडीओ पाहाच..

खरं तर, या व्हिडिओमध्ये एक माऊंटन सिंह ‘भुताचा’ आवाज काढताना दिसत आहे, जो ऐकून तिथे उपस्थित असलेला पोलिस पळून जातो. रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात एक पोलीस काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो टॉर्च फिरवतो आणि पाहतो, तेव्हाच त्याला एक ‘भुताची’ किंचाळी ऐकू येते, जी ऐकून तो घाबरतो. मग लगेच तो आवाज ऐकताच पळत सुटतो. खरतर ती माऊंटन सिंहाची डरकाळी असेल, जे त्या पोलीस कर्मचाऱ्याला ‘भूत’ वाटले असेल आणि तो पळू लागला असेल किंवा त्याने तो माऊंटन सिंह पाहिला असावा. खरं तर रात्रीच्या अंधारात अशा किंकाळ्या ऐकू आल्या तर कुणालाही भीती वाटणे साहजिकच आहे.

( हे ही वाचा: Video: डोक्यावर पदर, लेहेंगा आणि ते…; ‘या’ दोन महिलांच्या तुफान बुलेटस्वारीवर नेटकरीही फिदा)

पोलीस कर्मचारी कसा घाबरून पळून गेला तो एकदा पाहाच…

( हे ही वाचा: ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, १ किलोची किंमत ऐकून नेटकरी म्हणाले “इतक्यात तर…”)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @OTerrifying नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. माऊंटन सिंहाच्या डरकाळीने पोलीस घाबरला’ असे कॅप्शन लिहिले आहे. अवघ्या ८ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १ मिलियन म्हणजेच १० लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ४५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 19:53 IST

संबंधित बातम्या